Posts

Showing posts from December, 2019

देव- मंदिर - दानपेटी - श्रद्धा

देव- मंदिर - दानपेटी - श्रद्धा  मूळ प्रश्न : देवाच्या दानपेटीत पैसे राहणे योग्य की त्या पैशातून त्याच गावातील नागरी सुविधा उभारणे योग्य? आपली भावना नक्कीच चांगली आहे ! चला त्याच अनुषंगाने विचार करूया ! थोडेसे विस्तृत स्वरूपात मांडतो ! टीप : मी क्वचितच मंदिरात जातो, परंतु माझ्या निरीक्षणातून मांडतो ! आपण गावातील मंदिराच्या दानपेटीबाबत प्रश्न विचारला आहात तर प्रथम गावातील मंदिराचा विचार करूया ! कोणतेही गाव घ्या, मी नाशिकचा असल्याने मी दिंडोरी घेतो ! १) दिंडोरी मध्ये किती मंदिर असतील ? २) एका मंदिराच्या दानपेटीमध्ये किती पैसे जमा होत असतील ? ३) त्या मंदिराच्या व्यवस्थापनेसाठी किती खर्च होत असेल ? ४) माझ्या परिचयाचे एक दत्त मंदिर आहे, त्याच्या दानपेटीत मोठ्या मुश्किलीने महिन्याला १००० रु. पण जमा होत नाही ! आताच दत्त जयंती साजरी झाली, जयंती महोत्सव, 3 दिवस भजन-किर्तन, समारोपाला प्रसाद म्हणून जवळपास 600 ते 700 लोकांना अन्नदान ! एकुण खर्च ४०,००० रु ! आता यातून सगळ्या मंदिरांची दानपेटी जरी खोलली तर किती पैसे नागरी सुविधेसाठी वापरात येऊ शकतील ? आता महत्वाचा मुद्

C.A.A ( नागरिकत्व संशोधन कायदा ) विश्लेषण !

Image
प्रश्न : नागरिकत्व संशोधन विधेयक काय आहे ? उत्तर : भारताच्या शेजारी म्हणजेच पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान  ३ देशातून धार्मिक भेदभावातून झालेल्या अत्याचारामुळे  ज्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्चन नागरिकांना पलायन करावे लागले आहे त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याचा प्रयत्न ह्यात समाविष्ट आहे ! त्यासाठी देखील अट आहे, त्यांनी १४ डिसेम्बर २०१४ च्या आधी भारतात प्रवेश केलेला असला पाहिजे. नागरिकता अधिनियम १९५५ नुसार जे नागरिक ११ वर्षांपासून भारतात वास्तव्य करत आहे ते नैसर्गिग नागरिकता मिळणेसाठी पात्र ठरतात. ३ देश व ६ धर्माच्या नागरिकांसाठी हि अट शिथिल करून ५ वर्ष करण्यात आली आहे ! प्रश्न : ह्या विधेयकाचा वाद काय आहे ? उत्तर : विरोधकांकडून ह्या विधेयकाला मुस्लिम विरोधी रंग देण्याचा प्रयत्न होतांना दिसून येत आहे, जेव्हा देशात राहणाऱ्या मुस्लिमांचा ह्या विधेयकाशी काहीही संबंध नाहीये. विरोधकांकडून अशी भीती पसरावण्यात येत आहे कि देशांतील मुस्लिमांना आपले नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्र सादर करावे लागतील, जे पूर्णपणे चुकीचे आहे ! सरकारचे म्हणने आहे कि पाकिस्तान, बां

हैदराबाद चकमक ! सूड की न्याय ?

Image
          pic credit MANJUL  लेख वाचण्याआधी.... *सद्विवेकबुद्धीला जागरूक ठेवून लेख समजण्याचा प्रयत्न करावा ! *माझ्यात सद्गुणविकृती नाहीये अस माझं स्पष्ट मत आहे ! *ठार झालेल्या आरोपींबद्दल मला कोणत्याही प्रकारची सहानुभूती नाहीये ! *मला पडलेले प्रश्न हे न्याय की सूड ह्या दृष्टिकोणातुन पहावें ! हैदराबाद चकमक ! सूड कि न्याय ? सकाळी ऑफिसला निघण्याच्या आधी सवयीप्रमाणे न्यूज़ पोर्टल चाळायला घेतल आणि ही बातमी समोर आली ! घटनेबद्दलची चीड व त्यातूनच स्वाभाविकपणे आलेली उद्विग्नता ह्या दोहोंच्या मिश्रणामुळे मनाला ही बातमी काही क्षणासाठी सुखावह वाटली परंतु मेंदूने त्वरित मनाशी चढाओढ सुरु केली आणि काही प्रश्न उपस्थित केले ! ०) हा सूड आहे की न्याय ? दोन्हींमध्ये खूप अंतर आहे !  १) हा स्ट्रीट-जस्टिस जर सुखावह वाटला तर काही दिवसांपूर्वीच साजरा केल्या गेलेल्या संविधान दिनाला काही अर्थ उरतो का ? २) आरोपी ते गुन्हेगार हा निर्णयात्मक प्रवास ज्या न्यायव्यवस्थेवर आधारित आहे तिचे काही महत्व उरते की नाही ? ३)बलात्काराचे वर्गीकरण असु शकते का ? कुठलाही बलात्कार हा नृशंसच असतो.

भाड्याचे लोकपाल कार्यालय !

Image
२०११ मध्ये जंतर-मंतर येथे लोकपाल कायदा संमत व्हावा यासाठी श्री.अण्णा हजारे यांच्यासोबत किरण बेदी, अरविंद केजरीवाल, रामदेव बाबा व मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त आंदोलनाला सुरवात केली होती ज्याने तत्कालीन काँग्रेस शासनाला खीळखीळे करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती ! मार्च २०१९ मध्ये हो-नाही करत करत भाजप शासनाने लोकपाल कायद्याला पूर्णत्वास नेले ! आता ह्या लोकपाल कार्यालया संबंधी माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. शुभम खत्री यांनी माहितीच्या अधिकारा अंतर्गत मागविण्यात आलेल्या माहितीमध्ये काही महत्वाच्या बाबी उघड झाल्या आहेत, त्या पाहूया ! १) मार्च २०१९ मध्ये प्रथम लोकपाल म्हणून सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश श्री. पी.सी. घोसे यांची निवड करण्यात आली. पी.सी. घोसे यांच्यासोबत ८ जणांची कार्यालयीन कामकाजासाठी नियुक्ती करण्यात आली. २) लोकपाल कार्यालयासाठी २२ मार्च २०१९ ते ऑक्टोबर २०१९ पर्यंत कायमस्वरूपी जागा नसल्या कारणाने दिल्लीतील पंचतारांकित हॉटेल अशोकाच्या तब्ब्ल १२ खोल्या आरक्षित करण्यात आल्या. ३) हॉटेल अशोकाच्या १२ खोल्यांचे महिन्याचे भाडे रु. ५० लाख अस