देव- मंदिर - दानपेटी - श्रद्धा


आपली भावना नक्कीच चांगली आहे ! चला त्याच अनुषंगाने विचार करूया ! थोडेसे विस्तृत स्वरूपात मांडतो !
टीप : मी क्वचितच मंदिरात जातो, परंतु माझ्या निरीक्षणातून मांडतो !
आपण गावातील मंदिराच्या दानपेटीबाबत प्रश्न विचारला आहात तर प्रथम गावातील मंदिराचा विचार करूया !
कोणतेही गाव घ्या, मी नाशिकचा असल्याने मी दिंडोरी घेतो !
१) दिंडोरी मध्ये किती मंदिर असतील ?
२) एका मंदिराच्या दानपेटीमध्ये किती पैसे जमा होत असतील ?
३) त्या मंदिराच्या व्यवस्थापनेसाठी किती खर्च होत असेल ?
४) माझ्या परिचयाचे एक दत्त मंदिर आहे, त्याच्या दानपेटीत मोठ्या मुश्किलीने महिन्याला १००० रु. पण जमा होत नाही !
आताच दत्त जयंती साजरी झाली, जयंती महोत्सव, 3 दिवस भजन-किर्तन, समारोपाला प्रसाद म्हणून जवळपास 600 ते 700 लोकांना अन्नदान ! एकुण खर्च ४०,००० रु !
आता यातून सगळ्या मंदिरांची दानपेटी जरी खोलली तर किती पैसे नागरी सुविधेसाठी वापरात येऊ शकतील ?
आता महत्वाचा मुद्दा गावातील नागरी सुविधेसाठी आपल्याकडे संविधानिक संस्था आहेत जसे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद त्यांचे ते योजून दिलेले काम आहेत !
हेच शहरातील मंदिरांचे देखील आहे ! बोटावर मोजण्याइतके मंदिर सोडले तर कोणत्या मंदिराची दानपेटी संपूर्ण भरत देखील नाही ! उत्सव-सण-व्यवस्थापन याचा खर्च मंडळाला खिशातून करावा लागतो !
आता ह्या मंदिरात येणारा सर्व वयोगटातील वर्ग, जास्त करून वृद्ध आपल्या श्रद्धेने मानसिक शांततेसाठी मुखत्वे येत असतो ज्याला आपण बुद्धिभेदाने थांबवू नाही शकत !
आता मोठ्या मंदिरांची गोष्ट जसे शिर्डी, बालाजी, सिद्धीविनायक ई.
शिर्डीचे उदाहरण घेऊया !
जवळपास २०,००० ते ३०,००० भावीक सरासारी रोज दर्शनास संपूर्ण भारतातुन येतात, उत्सवात हा आकडा लाखांच्या पुढे जातो ! ज्यामुळे स्थानीक लोकांना रोजगार व सर्व सुविधामूळे सरकारला मिळणारा महसूल कित्येक कोटींचा आहे !
शिर्डीमध्ये रोज हजारो लोक मोफत जेवण करतात !
२०१८ मध्ये तर शिर्डी संस्थेने महाराष्ट्र सरकारला कालवा बांधण्यासाठी ५०० कोटी रु. बिनव्याजी दिले होते असे माझ्या आठवणीत आहे !
त्यांचे कमी खर्चात व मोफतदेखील उपचार सुविधा देणारे रुग्णालय, गरीब विद्यार्थी शिक्षणासाठी उपक्रम असे बरेच समाजउपयोगी कार्य ते करत असतात हे त्यांचे दरवर्षी जाहीर होणारे जमा-खर्चाचे अहवाल जे सार्वजनिक उपलब्ध आहेत ते वाचल्यावर लक्षात येतील !
हेच सर्व मोठ्या देवस्थानांच्या बाबतीत देखील आहे ज्याची माहिती सर्वांना त्यांच्या वार्षिक अहवालामध्ये उपलब्ध होऊ शकते अथवा कुणीही माहिती अधिकार वापरून देखील माहिती मागवू शकतो !
आता मंदिरातील भ्रष्टाचार !
तर असे कोणते क्षेत्र आहे जिथे भ्रष्टाचार नाही ?
सर्वात महत्वाचे :
बऱ्याच जणांची मानसिक शांततेची पूर्तता दारू-जुगार-सिनेमा-भटकंती-लेखन-वाचन अजून बरेच काही खर्चिक साधनांनी होत असते तर बऱ्याच जणांची मंदिरात जाऊन दानधर्म करून !
धन्यवाद !
निर्भीड.कॉम
Nirbhid.com

Comments