लेख वाचण्याआधी....
हैदराबाद चकमक ! सूड कि न्याय ?
सकाळी ऑफिसला निघण्याच्या आधी सवयीप्रमाणे न्यूज़ पोर्टल चाळायला घेतल आणि ही बातमी समोर आली ! घटनेबद्दलची चीड व त्यातूनच स्वाभाविकपणे आलेली उद्विग्नता ह्या दोहोंच्या मिश्रणामुळे मनाला ही बातमी काही क्षणासाठी सुखावह वाटली परंतु मेंदूने त्वरित मनाशी चढाओढ सुरु केली आणि काही प्रश्न उपस्थित केले !
०) हा सूड आहे की न्याय ?
दोन्हींमध्ये खूप अंतर आहे !
१) हा स्ट्रीट-जस्टिस जर सुखावह वाटला तर काही दिवसांपूर्वीच साजरा केल्या गेलेल्या संविधान दिनाला काही अर्थ उरतो का ?
२) आरोपी ते गुन्हेगार हा निर्णयात्मक प्रवास ज्या न्यायव्यवस्थेवर आधारित आहे तिचे काही महत्व उरते की नाही ?
३)बलात्काराचे वर्गीकरण असु शकते का ? कुठलाही बलात्कार हा नृशंसच असतो. मग ऐसे असतांना बलात्काराच्या गुह्यात शिक्षा भोगत असलेल्या त्या तमाम सर्वधर्मीय सामान्यजनांना मोक्षमार्ग दाखविणारे तथाकथित धर्मगुरुं, राष्ट्रउभारणी करण्यासाठी कटिबद्ध असलेले लोकप्रतिनिधि व त्यांच्या चपला डोक्यावर मिरवणारे त्यांचे कार्यकर्ते, पांढरपेशा म्हणवुन मिरवूण घेणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ति, कायद्याचे रक्षक व ऐसे अनेक कितीतरी बलात्कर करणारे व शिक्षा भोगत असलेल्यांना देखील ह्याच न्यायाने गोळ्या का घातल्या जावू नये ?? जर सर्वांना समान न्याय दिला जाणार नसेल तर ह्याला न्याय कसा म्हणता येईल ?
४)जर बलात्काराच्या सर्व गुन्हेगारांना गोळ्या हा न्याय देता येणार नसेल तर ह्या चकमकीचा उत्सव का म्हणून साजरा झाला पाहिजे ? हा आपल्या समाजाचा दांभिकपणा नाही का ?
५) आरोप सिद्ध होण्याची वाट न पाहता फक्त चीड़लेल्या समाजमनावर नियंत्रण मिळविण्यासाठी घडवून आणलेल्या चकमकीमधे एकजण जरी निर्दोष मारला गेला असेल तर ?
६) न्यायव्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कमी होण्याचे कारण माहित असुंनदेखिल त्यावर कोणत्याही सरकारकडून कोणतीही उपाययोजना होत नसताना सर्वपक्षीय समर्थक आप-आपल्या श्रद्धेय पक्षाला याबाबत ठोस पावल उचलण्यासाठी धारेवर का धरत नाही ?
७) कायद्याची भीती वाटली पाहिजे म्हणून न्यायप्रक्रिया जलद करणे हा संविधानात्मक राजमार्ग सोडून नवीन भ्रष्ट पद्धतीला जन्म देण्यामुळे त्याचे दुरुउपयोग कोणत्या पातळीवर होऊ शकतात ?
८) छत्रपतींनी अशा प्रकारच्या आरोपींना हत्तीच्या पायाखाली दिल असत असेही मन बुद्धीला समजवायचा प्रयत्न करते परंतु बुद्धी मनाला विचारते आमच्या छत्रपतींच्या नैतिकतेच्या 1% सुद्धा नैतिकता आज कायद्याला राबविणाऱ्या अथवा सत्ताधाऱ्यांच्या वृत्तीमध्ये आहे काय ?
९) उद्या बलात्काराच्या खोट्या आरोपामध्ये एखाद्या निर्दोषाला गुंतविण्यात आले तर हाच ताबडतोब न्याय किती उपयुक्त ठरतो ?
१०) कोपर्डी बलात्कार घटणेनंतर तमाम देशाला एक आदर्श संयमी आंदोलनाची दिशा दाखवणारे लाखोंच्या संख्येचे शिस्तबद्ध आंदोलनाचे कौतुक करावे की स्ट्रीट जस्टीसचे समर्थन ? कारण दोन्ही परस्परविरोधी असल्याने दोन्हींचे समर्थन शक्य नाही !
११) सुपारी घेऊन असे स्ट्रीट जस्टीसचे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येईल का ?
१२) आम्हाला जलद न्यायव्यवस्था हवी की झुंडीने दगडे हातात घेऊन रस्त्यांना रक्तबंबाळ करणारा समाज ?
सद्विवेकबुद्धीने विचार करणे गरजेचे आहे !
*सद्विवेकबुद्धीला जागरूक ठेवून लेख समजण्याचा प्रयत्न करावा !
*माझ्यात सद्गुणविकृती नाहीये अस माझं स्पष्ट मत आहे !
*ठार झालेल्या आरोपींबद्दल मला कोणत्याही प्रकारची सहानुभूती नाहीये !
*मला पडलेले प्रश्न हे न्याय की सूड ह्या दृष्टिकोणातुन पहावें !

0 Comments