दिवस १७ : ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय २ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी अध्याय २ : साधनपाद स्थिरसुखम् आसनम् ॥२.४६॥ प्रयत्नशैथिल्यानन्तसमापत्तिभ्याम् ॥ २.४७॥ ततो द्वन्द्वानभिघातः ॥ २.४८॥ तस्मिन्सति श्वासप्रश्वासयोर्गतिविच्छेदः प्राणायामः ॥ २.४९॥ बाह्याभ्यन्तरस्तम्भवृत्तिर्देशकालसंख्याभिः परिदृष्टो दीर्घसूक्ष्मः ॥२.५०॥ बाह्याभ्यन्तरविषयाक्षेपी चतुर्थः ॥२.५१॥ ततः क्षीयते प्रकाशावरणम् ॥ २.५२॥ धारणासु च योग्यता मनसः ॥ २.५३॥ अध्याय २ : साधनपाद : सारांश १) शरीर ज्या स्थितीत राहिले असता मन व शरीर ह्या दोहोस सुख व स्थिरता लाभेल अशा आसनास सुखासन असे म्हणतात ! २) शारीरिक हालचाली करण्याविषयी जी सहज प्रवृत्ती असते तो प्रयत्न होय ! ३) ह्या प्रयत्नामध्ये तन्मयता व शिथिलता साधल्यानंतर आसन स्थिर व सुखावह होते ! ४) आसन स्थिर झाले असता राग-द्वेष इत्यादि द्वंदाचा त्रास होत नाही ! ५) शरीरातील सर्व विकृती नाहीशा होवून पूर्ण आरोग्य प्राप्त झाल्यानंतर अष्टांगयोगाचा अभ्यास सुकर होत असतो ! ६) हठयोगातील २ ते ३ आसन वगळता इतर आसन हे अष्टांगयोगास निरुपयोगी आहे ...
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू !