!! पार्श्वभूमी !! दिनांक : १२ मार्च १९९३ वेळ : दु. १.३० ठिकाण : मुंबई स्टॉक एक्सचेंज आर्त किंकाळ्या , सगळीकडे रक्ता-मांसाचा सडा, एका क्षणात होत्याच नव्हत आणि या मृत्युच्या थैमानाची मालिकाच सुरु झाली. दु.१.३० पासून ते दु.३.४० पर्यंत देशाच्या आर्थिक राजधानीला हादरवणारे व देशाच्या सुरक्षेला अवाहन देणारे असे १२ बॉम्बस्फोट घडवले गेले, मच्छीमार चाळ, झवेरी बाजार , प्लाजा सिनेमा , सेंचुरी बाज़ार , कथा बाज़ार , होटल सी रॉक , सहार विमानतळ , एयर इंडिया बिल्डिंग , हॉटेल जुहू सेंटूर , वर ळी , मुंबई पासपोर्ट कार्यालय ह्या सगळ्या ठिकाणी मृत्यूने नंगानाच केला ज्यात तब्बल २५७ बळी व १४०० वर गंभीर जखमी झाले. देशात प्रथमच ३००० किलो इतक्या मोठ्या प्रमाणात RDX चा वापर करून देशाविरूद्ध उघड उघड युद्धच पुकारले गेले होते. ज्यांच्या सैतानी डोक्याचा हा खेळ होता ते हा देश सोडून कधीच पळून गेले होते. टायगर मेमन / याकुब मेमन / दाऊद इब्राहीम / दाऊद फणसे हे ह्या कटाचे मुख्य सूत्रधार होते व यांनी पाकिस्तानच्या ISI ह्या गुप्तचर संस्थेशी हातमिळवणी करून देशद्रोहाची परिसीमा गाठली होती. मृत – जखमी व्यक्