"एकीचे बळ" विस्मृतीत गेलेली कथा !

"एकीचे बळ" विस्मृतीत गेलेली कथा !


लहानपणी जवळपास सगळ्यानीच एक गोष्ट वाचली-ऐकली असेल, त्या गोष्टीचे नाव होते एकीचे बळ ! गोष्ट खुपच साधी अणि सोपी होती परंतु दुर्दैवाने बहुतेक सामान्यजन ती गोष्ट साफ विसरलेले दिसत आहेत. परंतु एक असा वर्ग आहे ज्याने ह्या गोष्टीचा खुप उत्तमरीत्या अभ्यास केला आहे व् त्याचा वापर तो वर्ग आपले हित साधन्यासाठी वर्षो न वर्षो करत आहे. तो वर्ग म्हणजे “राजकीय नेत्यांचा वर्ग”
आता राजकीय म्हटल तर त्यात प्रत्येक पक्षाचा समावेश होतो हे पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्याने समजुन घ्यावे ! लेखकाचा पक्ष शोधायची तसदी घ्यावी लागु नए म्हणून आधीच नमूद केल !
गोष्ट काय होती ? एक काठी तुटायला सोपी असते, २ थोड्या अवघड, ३ अजुन अवघड, जशा-जशा काठ्या एकत्र बांधणार तस-तशा त्या तुटायला अवघड जातात ! बोध होता एकीचे बळ !
आपण सर्व सामान्य मतदार ( जे कुठल्याही पक्ष-संघटना-जातीय/धार्मिक संघटना यांचे सदस्य नाहीं ) हे विखुरलेल्या काठ्याप्रमाणेच आहोत व् आपण तसेच रहावे हे प्रत्येक राजकीय पक्षाच्या हिताचे आहे. म्हणुनच तर आपण सर्व जात-धर्म-भाषा-प्रांत-व्यवसाय-शिक्षण ह्या सारख्या भावनिक मुद्द्यांवर कायम एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे असतो, आपल्याला एकमेकाविरोधात उभ कोण करतय व् का करतय एव्हढ्या साध्या गोष्टीचा बोध आपल्याला होत नाहीये. आपण रोज कोणत्या न कोणत्या भावनिक ( जात-धर्म-भाषा-प्रांत-व्यवसाय-शिक्षण ) मुद्द्यावरुन गुद्द्यावर येत आहोत व् मूळ मुद्दे दुर्लक्षित करत आहोत. सर्व मुद्यावर चर्चा होयलाच हव्यात, पण त्या चर्चा गुद्द्यावर जावून एकी भंग होता कामा नये. सत्ता मिळविण्यासाठी/टिकवण्यासाठी विखुरलेल्या लोकाना ताब्यात ठेवण सोप असत ही परकीय आक्रमकांची/इंग्रजांची नीती कित्येक शतकापासून ह्या बुद्धिमान-बलाढ्य लोकांच्या देशाला गुलाम म्हणवून वागवण्यासाठी वापरण्यात आली व तीच नीती आज सर्वच राजकीय पक्षाकडूनदेखील वापरण्यात येत आहे हे जोपर्यंत “फक्त भारतीय” म्हणून आपण विचार करणार नाही तो पर्यंत तुम्ही फक्त वापरलेच जाणार व एकमेकांची टाळकी फोडत बसणार व पुढच्या पिढीचे भविष्य अंधारात ढकलणार !
वैचारिक मतभेद हे असणारच, परंतु वैचारिक मतभेदावरून मनभेद होता कामा नये. प्रत्येक जण आपल्या अभ्यास-विश्वास-श्रद्धा-अंधश्रद्धा-अनुभव-कुवती प्रमाणे बोलणार व् मुद्दे मांडणार, तेव्हा त्यावर नक्कीच चर्चा झाली पाहिजे, परंतु ती एकमेकांच्या जाती-धर्मं-भाषा-प्रांत-महापुरुष याना मधे न आणता, त्यांचा योग्य तो सन्मान ठेवूनच. एकमेकांच्या मतांचा-भाषेचा-जातीचा-धर्माचा आदर ठेवून देखील भांडता येत की. का राजकीय नेत्यांनी आपल राखून ठेवून लावलेल्या आगीत आपण आपल सर्व जाळून आपली व आपल्या पुढच्या पिढ्यांची राख करणार आहोत ?
एकतर कोणत्याही मुद्द्यावर मत मांडण्याआधी स्वतः १० वेळेस खात्री करायला हवी की मी/माझे नेते हे मत मांडण्यासाठी योग्य आहे का ? मला सत्य माहित आहे का ? मी ह्या विषयावर बोलण्यास योग्य आहे का ? माझी कृती माझ्या मतांशी मेळ खाते का ? कुठला तरी फालतू आलेला मेसेज-व्हिडिओ-फोटो याची सत्यता मी पडताळली आहे का ? एवढ जरी पोस्ट करण्याआधी पाळल तरी ५० % वर होणारे आप-आपसातले मनभेद टाळले जावू शकता ! मिडिया-पत्रकार-लेखक-कवी-खेळाडू-अभिनेते-सरकारी अधिकारी अशा प्रत्येक वर्गातील प्रसिद्ध व्यक्तींचा वापर हा सर्वच राजकीय पक्षां कडून मनभेद करण्यासाठी केला जातो व सामान्यजन देखील यांच्या मुखवट्याला भुलून आप-आपसात भांडत बसतात. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यानी राष्ट्रहित-राष्ट्रप्रेम-राष्ट्रधर्म सर्वोपरी ही भावना फक्त मनात न ठेवता कृतीत आणायची ठरवली तर त्यांच्याकडून त्यांच्या नेत्यांच्या चुकीच्या गोष्टीचे समर्थन होणार नाही. एकतर नेते निवडत असतांनाच त्यांचे कर्तुत्व-योग्यता तपासूनच त्यांच्यवर आपल्या आयुष्याला खर्ची करायला हव. कुणा नेत्याचा  मुलगा/नातू/पुतण्या/काका/मामा आहे म्हणून त्याला जर कुणी आपल नेता मानत असेल तर तो जाणतेपणी स्वतःला व पुढच्या पिढीला गुलामगिरीत ढकलत आहे ! आता ज्यांचे पोटच फक्त आपल्या नेत्यांच्या चपला डोक्यावर घेतल्याने भरत असेल त्यांच्याकडून राष्ट्रहित-राष्ट्रप्रेम-राष्ट्रधर्म ह्याची अपेक्षा ठेवण हे मूर्खपणाच ठरेल !
आजची सामाजिक परिस्थिती ही प्रचंड प्रमाणावर तयार झालेला मनभेद याचाच परिणाम आहे. लहाणपणीचे जीवाभावाचे मित्र, एकाच ठिकाणी काम करणारे सहकारी, गावा-गावातले, राज्य-राज्यातले लोक आज एकमेकांना शत्रुसमान भासू लागले आहे व त्याचा परिणाम संथ विषासारखा देशाला विकलांग करत आहे ! तेव्हा एकीचे बळ ही गोष्ट आठवा व मनभेद टाळा !

Post a Comment

2 Comments

  1. Yes sir your thoughts are correct but no budy knows why we are get separated in frindship because of only politics aa we don't get any thing from any party

    ReplyDelete