" संजू " चे वास्तव !

" संजू " चे वास्तव !



!! पार्श्वभूमी !!

दिनांक : १२ मार्च १९९३
वेळ : दु. १.३०
ठिकाण : मुंबई स्टॉक एक्सचेंज

आर्त किंकाळ्या, सगळीकडे रक्ता-मांसाचा सडा, एका क्षणात होत्याच नव्हत आणि या मृत्युच्या थैमानाची मालिकाच सुरु झाली. दु.१.३० पासून ते दु.३.४० पर्यंत देशाच्या आर्थिक राजधानीला हादरवणारे व देशाच्या सुरक्षेला अवाहन देणारे असे १२ बॉम्बस्फोट घडवले गेले, मच्छीमार चाळ, झवेरी बाजार, प्लाजा सिनेमा, सेंचुरी बाज़ार, कथा बाज़ार, होटल सी रॉक, सहार विमानतळ, एयर इंडिया बिल्डिंग, हॉटेल जुहू सेंटूर, वरळी, मुंबई पासपोर्ट कार्यालय ह्या सगळ्या ठिकाणी मृत्यूने नंगानाच केला ज्यात तब्बल २५७ बळी व १४०० वर गंभीर जखमी झाले. देशात प्रथमच ३००० किलो इतक्या मोठ्या प्रमाणात RDX चा वापर करून देशाविरूद्ध उघड उघड युद्धच पुकारले गेले होते. ज्यांच्या सैतानी डोक्याचा हा खेळ होता ते हा देश सोडून कधीच पळून गेले होते. टायगर मेमन / याकुब मेमन / दाऊद इब्राहीम / दाऊद फणसे हे ह्या कटाचे मुख्य सूत्रधार होते व यांनी पाकिस्तानच्या ISI ह्या गुप्तचर संस्थेशी हातमिळवणी करून देशद्रोहाची परिसीमा गाठली होती. मृत – जखमी व्यक्तीचे घरदार उध्वस्त झाले, पै-पै करून उभे केलेले व्यवसायांची राख-रांगोळी झाली, आधीच तणावात असलेल्या २ समाजाची तेढ वाढीस लागली, कुणी अनाथ झाल तर कुणी विधवा. कोण्या म्हाताऱ्या आई-बापाच एकुलत एक पोर गेल तर कुणाचे पोर जन्माला येण्याआधीच ठार मारल गेल! देश सुन्न झाला. खटला दाखल झाला. गुन्हेगार तर आधीच देश सोडून पळून गेले होते. 


पोलीस तपासात एक धक्कादायक बाब उघडकीस आली ज्यात संजय दत्त जो मोठ्या बापाचा म्हणजेच कॉंग्रेस खासदार सुनील दत्त यांचा बिघडलेल कारट म्हणून प्रसिद्ध होता त्याचा संबंध ह्या कारस्थानाशी जोडला गेला. पोलीस जरी म्हणत असले की त्यांनी रेकॉर्ड केलेल्या कॉलद्वारे ते संजय दत्त पर्यंत पोहोचले तरी तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त एम.एन.सिंग यांनी एका दिलेल्या मुलाखतीमध्ये इशाऱ्या-इशाऱ्याने नाव न घेता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच युसुफ नळवाला याची माहिती आपणास फोन करून सांगितल्याचा खुलासा केला. युसुफ नळवाला हा संजय दत्त याचा खास मित्र होता ज्याने संजय दत्त पर्यंत शस्त्र पोहोचविण्याची व्यवस्था केली होती. सिंग साहेब हेही सांगायला नाही विसरले की बाळासाहेबानीच नंतर संजय दत्त याच्या सुटकेसाठीदेखील प्रयत्न केले. सरकारी वकील उज्वल निकम यांना ह्या खटल्यां मधून बाहेरचा रस्ता कुणाच्या सांगण्यावरून दाखवण्यात आला होता याचा खुलासा देखील उज्वल निकम यांनी केलाच आहे. असो तो आपल्या लेखाचा विषय नाही.

आता ही सर्व पार्श्वभूमी सांगण अत्यंत गरजेच होत कारण संजय दत्त याचा नवीन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे “ संजू ” 
बॉलीवूडच्या आतापर्यंतच्या उद्योगांवरून अस दिसत की यात त्यांनी संजय दत्तसाठी सहानभुतीची लाट तयार करण्यासाठी संजय दत्त ह्या पात्राला परिस्थीतीचा शिकार, मातृप्रेमाला पारखा झालेला वगैरे-वगैरे लचांड घातल्याची शक्यता जास्त आहे. अरुण गवळीवरचा “डैडी” दाऊद इब्राहीमच्या बहिणीचा “हसीना पारकर” हे अशा उद्योगांचे ताजेतवाने उदाहरण आहेत. अर्थात तो चित्रपट पहिल्या नंतरच लक्षात येईल. परंतु बरेच जण अज्ञानामुळे म्हणा अथवा सोयीस्करपणे म्हणा अशा भावनिक जाळ्यात अडकून संजय दत्त सारख्या माणसाला आपला आदर्श मानून मोकळे होतात. त्यांच संजय दत्तप्रती असलेल प्रेम हा त्यांचा वैयक्तिक विषय नक्कीच आहे, शेवटी आपली-आपली आवड असते जी आपल्या विचारांचं प्रतिबिंबच असते !

हाच संजय दत्त जो मुंबई ब्लास्ट मध्ये वापरण्यात आलेल्या शस्त्रांपैकी काही शस्त्रे आपल्या घरात लपवून ठेवतो, ज्यात ३ AK-56, ९ म्यागेझीन, ४५० कारटीरेज, ९ mm पिस्तोल आणि तब्बल 20 हैण्ड ग्रेनेड यांचा समावेश होता. दत्त याचे चाहते बहुतेक २५७ बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांच्या वेदनेला कदाचित समजू शकत नाही अथवा वर सांगितल्याप्रमाणे हा त्यांच्या अज्ञानाचा भाग असू शकतो ! अथवा सोयीस्करपणे ह्या घृणास्पद-देशद्रोही कृत्याकडे ते कानाडोळा तरी करत असतील. खूप जणांचा युक्तिवाद असा आहे की त्याने शिक्षा तर भोगलीये मग त्याला का म्हणून त्रास ? काय शिक्षा भोगलीये संजय दत्त याने ? एक खासदार पुत्र-एक बॉलीवूड अभिनेता म्हणून संजय दत्त याला संपूर्ण खटल्यामध्ये कमीत-कमी शिक्षा मिळावी म्हणून जी मदत पुरवली गेली त्यावरून हेच सिद्ध होते की इथे सत्तेच्या व लक्ष्मीच्या जोरावर सर्वात मोठी लोकशाही ह्या गोंडस नावाखाली न्यायव्यवस्थेला तुम्ही हव्या त्या पद्धतीने वाकुल्या दाखवू शकतात ! त्याच्यावरच्या आरोपांना कमकुवत सिद्ध करण्यासाठी अनिस इब्राहीम व संजय दत्त याच्यामधले ७ कॉल्स रेकॉर्डिंग सुद्धा न्यायालयात सादर केलेले नाहीत. असे अनेक पुरावे होते जे संजय दत्तला याकुब मेनेन सारख फासावर लटकवण्यासाठी पुरेसे होते. परंतु त्याला फक्त विना-परवाना शस्त्र  बाळगणे ह्या गुन्ह्याखाली शिक्षा झाली व ती त्याने किती चित्रपटांची शूटिंग पूर्ण करत कापली आहे हे सर्वज्ञात आहेच ! देव न करो असे सौभाग्य देशातल्या प्रत्येक गुन्हेगाराला मिळो ! याच्या समर्थनार्थ अजब-गजब लेख वाचायला मिळतील जसे..

  •  संजय दत्त हा बॉम्बस्फोट कटात सहभागी नव्हता.
  •  त्याला बॉम्बस्फोट बद्दल नंतर कळल.
  • त्याने स्व-संरक्षणहेतू हे शस्त्र मागवले.
  • त्याने स्वतःहून त्याचा गुन्हा कबूल केला.
  • ह्याच्या पहिला चित्रपट प्रदर्शित होयच्या आगोदरच याच्या आईचे निधन झाले म्हणून हा अमली पदार्थ सेवन करू लागला !
  • त्याने त्याचे व्यसन सोडवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला.
  • त्याने कारागृहात अनेक कैद्यांना चांगल्या वर्तुणुकीचे महत्व पटवून दिले.
असे एक न अनेक सहानुभूतीचे फुगे फुगवून बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयाच्या जखमेवर मीठ चोळणारी बुद्धिहीन जनता देखील ह्या देशात राहते. जेलमध्ये जातांना-येतांनाचे व्हिडीओ-फोटोमध्ये त्याचा अविर्भाव एका क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या सारखा असायचा आणि मीडीया तर बाबा-बाबा करत आपल्या कातडीच्या चपला त्याच्या पायात घालते की काय असे वाटायचे.



याकुबच्या फासाविरोधात उतरणाऱ्या तथाकथित बुद्धीजीवांची फौज सगळ्यांनी पाहिलीच आहे.
  • स्वतःहून तब्बल ७ वेळा अनिस इब्राहीमला फोन करून शस्त्र ( ज्यात ३ AK-56, ९ म्यागेझीन, ४५० कारटीरेज, ९ mm पिस्तोल आणि तब्बल 20 हैण्ड ग्रेनेड ) मागव्णाऱ्याला कटाबद्दल माहित नव्हते ? 
  • जर त्याला एवढे शस्त्र मिळू शकतात तर बंदरावर किती उतरवले गेले ( ३००० किलो RDX ) असतील याची त्याला कल्पना नसेल ? दिवाळी मध्ये फटकेबाजीसाठी तर हे शस्त्र नक्कीच मागवले गेले नसतील याची त्याला कल्पना असेलच !
  • केंद्रात सत्ताधारी पक्षाचा एक खासदारपुत्र-अभिनेता स्व-संरक्षणासाठी अतिरेक्याकडून शस्त्र मागवतो ? सरकार त्याला संरक्षण पुरवू शकत नव्हती ? त्याने तशी मागणी तरी केली होती का ? आणि स्व-संरक्षणासाठी ३ AK-56, ९ म्यागेझीन, ४५० कारटीरेज, ९ mm पिस्तोल आणि तब्बल 20 हैण्ड ग्रेनेड ?
  • त्याने गुन्हा कबूल केला की सत्ता आणि लक्ष्मीकृपेने स्वताची कातडी वाचवली ?
  • जगात किती जण अनाथ होतात ? सर्व अमली पदार्थ सेवन करतात ?

बॉलीवूडच्या क्रांतिकारकांच्या माजोरड्या वर्तुणुकिची (ज्यात भाई-बाबा सर्वात उच्च्स्थानावर) हजारो उदाहरण सार्वजानिकरित्या उबलब्ध आहेत.
त्याच समर्थन करणार्यांचा मेंदू एकतर वटाण्याच्या आकाराचा आहे किंवा त्यांना देशहितापेक्षा एका माजोरड्या अभिनेत्याचे देशद्रोही कृत्य मान्य आहे.
कठुआ बलात्कार प्रकरणामध्ये हातात I am Hindustan, I am ashamed असे पोस्टर घेऊन न्याय मागणाऱ्या अभिनेते-अभिनेत्र्या देशद्रोही कृत्यात सहभागी असणाऱ्या संजय दत्तच्या गळ्यात-गळे घालून नाचतांना दिसतील ! 


आणि याचा प्रत्यय नेहमीच येत असतो. 

२६/११ हल्यानंतर महेश भटच्या पुढाकाराने झालेल्या “ २६/११ RSS की साजीश” ह्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा तर कळसच होता ! 


ह्यात देखील डेव्हिड हेडलीद्वारे जो कटाचा सूत्रधार होता त्याच्याशी महेश भट याच्या मुलानचे म्हणजेच राहुल भट याचे नाव जोड़ले गेले होते व् त्यानेच बॉलीवुडच्या तब्बल १५ कलाकारांशी त्याची भेट देखिल घालून दिल्याची कबुली NIA ह्या तपासयंत्रणेला दिली होती.

जिथे जास्तीत-जास्त नागडेपणा हा उच्चभ्रूपणा समजला जातो त्यांच्याकडून दुसरी ती अपेक्षा तरी काय करू शकतो ? शेवटी मुंबई ब्लास्टचे मास्टर माइंडच यांचे माय-बाप आहे म्हटल्यावर नैतिकता कशाशी खातात हे ह्यांना ठावूक असण्याच काही कारण नाही.

असो “माजोरडा-लफडेबाज-बेवडा-नशेडी” संजय दत्तचे समर्थन कदाचित स्वीकाहार्य असू शकते कारण हे सर्व गुण कमी-अधिक प्रमाणात समाजात सर्वत्र आढळून येतातच ! पण देशद्रोही कृत्याच समर्थन करतांना थोडास्स्स्सस्स्स्सा विचार नक्कीच झाला पाहिजे ! बाकी संजय दत्तचे चाहत्यांनी त्याला जसे माफ केले तसेच मला त्याच्यावरील टीका ह्या माझ्या गंभीर गुन्ह्यासाठी माफ करतील असा विश्वास आहे !

जय हिंद ! वंदे मातरम् !

Post a Comment

1 Comments

  1. छान लिहिलंय. तत्वे नामशेष होऊन त्यांची जागा "Ideology"s ने घेतलीय म्हणून चे हे सगळे.... बौद्धिक ऊत्क्रांति(?)....

    ReplyDelete