राफेल व रा - हुल !

राफेल व रा - हुल !

राफेल व रा - हुल !



गेल्या काही महिन्यापासून  कांग्रेस अध्यक्ष मा.श्री. राहुल गांधी हिंदू-मुस्लिम-दलित-मनु फिरून झाल की पुन्हा राफेल व्यवहार यावर येत आहे, अणि जणू काही ह्याच मुद्यावर सद्य NDA सरकारला ते उलथावुन टाकतील की काय अशी भाबडी आशा कुटुंब समर्थकाना वाटते ! राहुल गांधी यांच्या आजवरच्या वाटचालीकड़े प्रमाणिकपणे पाहिल्यास, निष्ठेने नव्हे फ़क्त प्रमाणिकपणे पाहिल्यास त्यांना ह्या विषयाच फार गांभीर्य आहे अथवा त्यांच्या सल्लागाराना ( जे राहुल गांधी यापेक्षा जास्त लायक व् बुद्धिमान आहेत ) ह्या व्यवहारातल काहीच माहित नाही असे वाटत नाही. परंतु जर काही मुद्देच सापडत नसतील तर भ्रम-हूल पसरवणे मग ते भ्रम EVM बद्दल असो, लोकशाहीच्या खुना बद्दल असो, दलित-मुस्लिम अत्याचार असो, सर्जिकल स्ट्राइक असो अथवा राफेल व्यवहार असो. भ्रम हे मोठया शस्त्राप्रमाणे सर्वच राजकीय पक्ष-धुरंधर वापरत आले आहे व् ते कमी-अधिक प्रमाणात यशस्वी देखिल झाले आहे.

आता अविश्वास ठराव प्रस्तावाच्या भाषणात श्री. राहुल गांधी म्हणाले की मला फ़्रांसच्या राष्ट्र-अध्य्क्षानी सांगितले की आम्हाला झालेला व्यवहार उघड करण्यात काहीच अडचण नाही, फ्रांसकडून याचे लगेचच खंडन करण्यात आले आणि नेहमीप्रमाणे राहुल गांधी तोंडावर पडले. मला व् सामान्य जनतेला १०० वर्षपेक्षा जुन्या अत्यंत महत्वाच्या अशा मुख्य राजकीय पक्ष-अध्यक्षा कडून अशी बावळटपणाची अपेक्षा बिलकुल नाही.





सर्वात मोठी गंमत म्हणजे श्री. राहुल गांधी व् त्यांच्या मातोश्री ह्या आपल्या परदेश दौरा असो, आजारावर उपचार असो अथवा संपत्ति असों ह्याबाबत कमालीची गुप्तता बाळगतात व् त्यासाठी सुरक्षेचे कारण पुढे केले जाते मात्र देशसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गोपनीय अशा सुरक्षा व्यवहाराना सार्वजानिक करावे, सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे सादर करावे असे त्यांना व् त्यांच्या समर्थकाना वाटते ह्या पेक्षा मोठा विनोद तरी काय असू शकतो !

नेमकी हा राफेल व्यवहार आहे तरी काय ? UPA व् NDA च्या व्यवहारामधे मोठया रकमेची तफावत का आहे ज्याचा आधार घेवून श्री.राहुल गांधी आपले दंड थोपटत आहे ?  ह्यासाठी थोड मागे जाव लागेल.

१) २००० साली इंडियन एयरफोर्सने Medium Multi-Role Combat Aircraft (MMRCA) द्वारे भारत सरकारकड़े ( NDA )मिग-२५ ला पर्याय म्हणून आधुनिक लढावू विमानाची मागणी केलि.
२) २००१ मधे जाहिर करण्यात आल की १८ विमान खरेदी करण्यात येतील व् १०८ HAL म्हणजेच भारत बनवेल. (NDA)
३) यानंतर तब्बल ६ वर्षाने सरकारने (UPA) देश-सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या मागणीला पूर्ण करण्यासाठी २००७ मधे विविध देशांच्या कंपनीकड़े आधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेल्या लढावू विमानसाठी निविदा मागवण्यात आल्या !
४) २००८ मधे विविध कंपनीने आप-आपले प्रस्ताव भारत सरकारकड़े (UPA)सादर केले.
५) २०११ मधे म्हणजे तब्बल ३ वर्षानी विविध कंपनीमधून २ कंपनी ह्या व्यवहारासाठी योग्य ठरवण्यात आल्या !
६) २०१२ मधे कमी किमतीची निविदा म्हणून राफेल व्यवहार करण्याचे ठरवण्यात आले !
७) २०१३ मधे यावर फ्रांसशी चर्चा सुरु झाली !
८) २०१४ मधे दोन्ही देशात सरकार बदलले व् २००० पासून देशसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेली ही कसरत २०१४ मधे थंड पडली ! 

यावरून आपल्या राज्यकर्त्याना कोणत्य गोष्टीचे किती गांभीर्य आहे व् ते किती “जाणते” आहेत हे लक्षात घेतल पाहिजे !

९) २०१५ मधे पंतप्रधान श्री.मोदी फ्रांसच्या दौर्यावर गेल्यावर सरकार स्तरावर नविन किंमत व् व्यवहाराचे स्वरुप ठरवायचे पक्के करण्यात आले !




१०) में २०१६ मधे राफेल व्यवहारास दोन्ही देशानी मान्यता दिली व् २०१९ पर्यंत अत्याधुनिक ३६ लढावू विमाने भारतात येतील ह्यावर शिक्कामोर्तब झाले.





सर्वात आधी मा.श्री. राहुल गांधी यांनी २००१ ते २०१४ म्हणजेच तब्बल १४ वर्ष देशाला असुरक्षित का ठेवले याचे उत्तर द्यावे ! हाच मोठा भ्रष्टाचार आहे. असो !

श्री.राहुल गांधी यांच्यानुसार ह्या व्यवहारात ५०,००० करोड़ चा घोटाळा आहे.

                           UPA                                                    NDA
व्यवहार         ७९,००० करोड़ १२६ विमान                     ५८,००० करोड़३६ विमान
एक विमान ६२९ करोड़                                             १६११ करोड़
३६ विमान      २२,६४४ करोड़                                        ५८,००० करोड़

हा व्यवहार बघितल्यावर सहाजिक आहे भ्रम निर्माण करण्याची उत्तम संधि कुणीच सोडणार नाही.
परंतु व्यवहाराची रूपरेषा समजुन घेतली तर सद्य वायुसेना प्रमुख श्री.बिरेंदर सिंग धनोआ यांच्या नुसार हा व्यवहार आत्तापर्यंतचा सर्वात फायदेशीर व् उत्तम व्यवहार आहे हे मानण्यास हरकत नसावी ! ते भाजपचे नाही ! ( “वायुप्रमुख भाजपचे आहे” असे निष्ठावान म्हणुदेखिल शकतात )

NDA व् UPA व्यवहारमधील फरक.

NDA  व्यवहार.

१) हा व्यवहार ऑफसेट व्यवहार आहे म्हणजेच फ्रांसला कराराच्या ५० % रक्कम ही भारतातच गुंतवणे  गरजेचे आहे आणि फ्रांसने यातील २०,००० करोड़ आत्तापर्यंत गुंतवलेदेखिल आहे.

२) विमानासोबत काय ?

१५० किमी क्षमतेचे अत्याधुनिक Meteor मिसाइल.
३०० किमी क्षमतेचे अत्याधुनिक MICA मिसाइल.
active electronically scanned array(AESA) रडार ज्यात वैमानिक २००-३०० किमी पर्यंत येणारा हल्ला पाहू शकतो.
संपूर्ण आधुनिक शस्रास्त्र संच, हवमान माहिती उपकरण व् इतर आधुनिक उपकरण.
पहिले ५ वर्ष ७५ % विमान हवे तेव्हा उड्न्यासाठी सज्ज ही जबाबदारी फ्रांसची म्हणजेच सोप्या भाषेत मेंटनेंस फ्रांसकड़े. 
७ वर्ष कमी कीमतीत स्पेअर पार्ट्स.
भारतीय वैमानिक व् तंद्रज्ञ याना प्रशिक्षण.
२०१९ ही ३६ राफेल पूर्ण करण्याची मुदत.

UPA व्यवहार.

१) फ़क्त विमान म्हणजे सोप्या भाषेत BIKE WITHOUT ACCESSORIES.
२) ५ वर्ष कमी कीमतीत स्पेअर पार्ट्स.
३) १८ विमान फ्रांस बनवेल १०८ विमान भारत बनवेल.

NDA ने मीळवलेले राफेलसोबतचे सर्व फायदे तेहि एक मुदतीमधे जर UPA ने मीळवायचे ठरवले असते तर त्यासाठी UPA ला अजुन खर्च वेगळ्याने करावाच लागला असता व् तज्ञ मंडळीच्यानुसार तो आत्ताच्या व्यवहाराच्या १६ % जास्त असता ! त्यानी तो केला असता नसता हा वेगळा मुद्दा. व्यवहार ठरवण्यासाठी त्यानी तब्बल १४ वर्ष घेतले ! 

राहुल गांधीचा अजुन एक आरोप आहे की एवढी महत्वाचा व्यवहार त्यानी रिलायन्स सोबत केला HAL सोबत नाही. एकतर भारतातल्या कोणत्या कंपनी सोबत काम करायचे हे फ्रांसने ठरवले व् ते का ठरवले हेदेखील जाणने गरजेचे आहे. फ्रांसला हे विमान २०१९ मधे भारताला सुपुर्द करायचे आहेत व त्यासाठी त्यांनी ३ करोड़ मानवी कामाचे तास ही अट निर्धारित केलि होती ज्यासाठी HAL तयार नव्हती. HAL त्यासाठी ३ पट अधीक वेळ मागत होती जे भारताला परवडनयासारखे नाही कारण ३ वर्षाचे १० वर्ष म्हणजे खर्चदेखिल दुप्पट व् तोपर्यंत देशसुरक्षा रामभरोसे !

आता हे जे काही मांडले आहे ती सगळी माहिती सार्वजानिकरित्या उपलब्ध आहे, आणि याची मा.श्री. राहुल गांधी व् सर्व कुटुंबनिष्ठावंताना कल्पना नसेल अशी सुतराम शक्यता नाही. 

१) https://www.aljazeera.com/news/asia/2012/01/2012131153832917968.html
२) http://indianexpress.com/article/india/india-news-india/rafale-deal-17-months-later-from-e12-bn-to-7-8-bn-with-more-benefits-3043330/
३) https://www.thehindubusinessline.com/companies/reliance-defence-corners-offset-contracts-worth-21000-crore-on-rafale-deal/article9732240.ece

तरीदेखिल भ्रम पसरवून त्याचे राजकीय भांडवल कसे करायचे हे आपण विरोधी पक्षाकडून EVM, मुस्लिम-दलित सुरक्षा, न्याय व्यवस्थेवर अविश्वास, जज लोया मृत्यु, चर्च हल्ले, सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे मागने, १५ लाख व् अजुन काय काय ते वेळोवेळी पाहतच आलो आहे.

हे सर्व पाहिल्यावर २०१९ मधे NDA च्या विजयासाठी भाजपापेक्षा विरोधकच जास्त जबाबदार असतील असे वाटते !  

Post a Comment

0 Comments