देव- मंदिर - दानपेटी - श्रद्धा
देव- मंदिर - दानपेटी - श्रद्धा मूळ प्रश्न : देवाच्या दानपेटीत पैसे राहणे योग्य की त्या पैशातून त्याच गावातील नागरी सुविधा उभारणे योग्य? आपली भावना नक्कीच चांगली आहे ! चला त्याच अनुषंगाने विचार करूया ! थोडेसे विस्तृत स्वरूपात मांडतो ! टीप : मी क्वचितच मंदिरात जातो, परंतु माझ्या निरीक्षणातून मांडतो ! आपण गावातील मंदिराच्या दानपेटीबाबत प्रश्न विचारला आहात तर प्रथम गावातील मंदिराचा विचार करूया ! कोणतेही गाव घ्या, मी नाशिकचा असल्याने मी दिंडोरी घेतो ! १) दिंडोरी मध्ये किती मंदिर असतील ? २) एका मंदिराच्या दानपेटीमध्ये किती पैसे जमा होत असतील ? ३) त्या मंदिराच्या व्यवस्थापनेसाठी किती खर्च होत असेल ? ४) माझ्या परिचयाचे एक दत्त मंदिर आहे, त्याच्या दानपेटीत मोठ्या मुश्किलीने महिन्याला १००० रु. पण जमा होत नाही ! आताच दत्त जयंती साजरी झाली, जयंती महोत्सव, 3 दिवस भजन-किर्तन, समारोपाला प्रसाद म्हणून जवळपास 600 ते 700 लोकांना अन्नदान ! एकुण खर्च ४०,००० रु ! आता यातून सगळ्या मंदिरांची दानपेटी जरी खोलली तर किती पैसे नागरी सुविधेसाठी वापरात येऊ शकतील ? आता महत्वाचा मुद्