गांधीज - ठग्ज ऑफ नॅशनल हेराल्ड !
कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. राहुल गांधी यांनी आवेशाने राफेल ह्या विषयामधे ह्या न त्या प्रकारे इंधन ओतून ओतून त्याला ज्वलंत ठेवण्याचा प्रयत्न कित्येक महिन्यापासून सुरु ठेवला आहे ज्यामधे देशातील नामांकित “”बुद्धिवंतांची”” फौजदेखिल त्यांच्या साथीला इमाने-इतबारे उभी आहे !
परंतु ह्या बुद्धिवंतांच्या फौजेमधील एकही गांधीना ना नॅशनल हेराल्ड वर प्रश्न विचारतात ज्या केसमधे श्रीमती गांधी व श्री. रा. गांधी जामिनावर बाहेर आहेत न औगस्ता वेस्टलैंड केस मधील दलाली बद्दल ज्या मधे दलालाने स्वतः ह्यांचे नाव घेतले आहे ! मा. शरदचंद्र पवार तर याला गांधी कुटुंबियाविरुद्धच षडयंत्र घोषित करुन मोकळेदेखिल झाले आहेत !
निर्भिड व् निष्पक्ष पत्रकारितेचा टेंभा मिरवणारे ज्याना मोदी पंतप्रधान होण्यामागे जागतिक व्यापक कटाचा वास येतो असे नॅशनल हेराल्ड व् औगस्ता वेस्टलैंड ने लावलेल्या आगिकड़े सोयीस्कर दुर्लक्ष करतात !
नॅशनल हेराल्ड नेमकी काय प्रकरण आहे व् गांधी कुटुंबियानी कशी २००० करोड़ची ढेकर देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला हे समजुन घेणे गरजेचे आहे. हे समजुन घेतल्यावर गांधीमागे एवढी बुद्धिवंतांची / निर्भिड पत्रकारांची फौज का उभी आहे हे अगदी शेमडया पोराला देखिल कळल्याशिवाय राहणार नाही ! अट एकच निष्पक्ष असणे आवश्यक आहे ! डोक्यावर चपला असतील तर त्याला सगळच अलबेल दिसेल !
नॅशनल हेराल्ड पार्श्वभूमी व् घोटाळा !
• १९३८ साली माजी पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरु यांनी म्हणजेच कॉंग्रेसने नॅशनल हेराल्ड ह्या इंग्रजी व्रुत्तपत्राची सुरवात केलि व् त्यासाठी AJL ही कंपनी स्थापन करण्यात आली ज्यामधे १००० पेक्षा जास्त भागधारक होते. हिंदी मधे नवजीवन व् उर्दू मधे कौमी आवाज नावाने याचे प्रकाशन होत असे.
• १९४७ नंतर AJL ला संपूर्ण देशात अत्यंत कमी दरामधे मोक्याच्या अटी-शर्तिसहित जागा देण्यात आल्या, कॉंग्रेसचे सरकार व् कॉंग्रेसचेच मुखपत्र यामुळे अग्गदी सोप !
• २००८ मधे AJL कंपनी वाचक नसल्यामुळे बंद पडली ! कर्मचार्यांचे पगार व् इतर देणे असे ९० करोड़ रु. AJL च्या माथी होते. परंतु AJL ची एकुण संपत्ती जी १९३८ ते २००८ पर्यंत वृत्तपत्र व्यवसायसाठी अटी-शर्तिसहित पूर्ण देशभरात देण्यात आली होती तिची तत्कालीन किमत ही २००० करोड़ पेक्षा जास्त होती. सर्व संपत्ती हडपण्याचा खेळ इथेच सुरु होतो !
• २००८ मधे AJL चे संचालक होते कॉंग्रेसचे खजिनदार व् गांधीकुटुंब निष्ठावान श्री. मोतीलाल वोरा.
• नोव्हेंबर २०१० मधे श्री. राहुल गांधी यांनी यंग इंडिया प्रा.ली नावाने एक कंपनी (ट्रस्ट) सुरु केलि जिचे भांडवल रु. ५ लाख दाखवण्यात आले. यात ३८ % शेअर श्री. राहुल गांधी, ३८ % शेअर श्रीमती. सोनिया गांधी व् उर्वरित २४ % शेअर गांधीकुटुंब निष्ठावान श्री. मोतीलाल वोरा, सैम पित्रोदा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे ह्या ४ जणांची नावे होती.
• AJL चे संचालक श्री. मोतीलाल वोरा व् यंग इंडिया प्रा.ली चे संचालक देखिल श्री. मोतीलाल वोरा ! कांग्रेसचे खजिनदार देखिल श्री. मोतीलाल वोरा.
• एकाच महीन्यामधे म्हणजे डिसेम्बर २०१० मधे यंग इंडिया प्रा.ली ने २००० करोड़ पेक्षा जास्त संपत्ती असलेल्या AJL चा ताबा घेण्याचे ठरवले व् त्या बदल्यात AJL चे ९० करोड़चे देयके आपल्या माथी घेतले !
• त्यासाठी प्रस्ताव मांडण्याची सुचना त्यांनी यंग इंडिया प्रा.ली चे संचालक श्री. मोतीलाल वोरा याना दिली. म्हणजे यंग इंडिया प्रा.ली चे संचालक श्री. मोतीलाल वोरा हे AJL चे संचालक श्री. मोतीलाल वोरा यांना अधिग्रहण प्रस्ताव देणार ! आहे की नहीं गंमत ! अजुन गंमत तर पुढे आहे !
• तत्कालीन कांग्रेस अध्यक्ष श्रीमती. सोनिया गांधी यांनी AJL चे ९० करोड़ चे देणे हे कांग्रेस पार्टी फंड मधून विना व्याज कर्ज म्हणून देण्याचा निर्णय घेतला. ( नियम तोडून )
• कांग्रेस पक्षाचे खजिनदारदेखिल श्री. मोतीलाल वोरा !
• अर्थातच सगळे प्रस्ताव स्वत:ने स्वत:ला दिल्याने मंजूर झाले !
• २०१२ मधे AJL चा ताबा यंग इंडिया प्रा.ली ने फ़क्त ५० लाख रु. मधे घेतला व् कॉंग्रेसच्या खात्यात ८९.५० लाख रु. बुडित कर्ज दाखवण्यात आले.
• दिल्लीस्थित नॅशनल हेराल्डची ५ मजली ईमारत ज्याची किमत आज २००० करोड़ पेक्षा जास्त आहे ती सर्व नियम मोडून व्यवसायिक वापरासाठी भाड़ेतत्वावर व्यवसायिकाना देण्यात आली जिचे लाखो रु. भाड़े महिन्याला ७६ % भागधारक असलेल्या श्रीमती गांधी व् श्री. राहुल गांधी यांच्या यंग इंडिया प्रा.ली कड़े जाते !
• देशभरातील अशा सर्व संपत्ती ह्या व्यवसायिक माँल – ऑफिस साठी भाड़ेतत्वावर सर्व नीयमाना धाब्यावर बसवून देण्यात आले.
• २०१२ मधे जेव्हा तत्कालीन जनता पक्षाचे अध्यक्ष श्री. सुब्रमण्यम स्वामी यांनी या सगळ्या गफल्यावर तक्रार दाखल केली.
• २०१५ मधे पटियाला कोर्टने सर्व तथ्य समजुन घेत धोक्याने संपत्ती हडप करण्याच्या गुन्ह्यात श्रीमती. गांधी व् श्री. राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला ! सद्य स्थितीत दोघे जामिनावर बाहेर आहेत.
• डिसेम्बर २०१८ ला दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली स्थित दिल्लीस्थित नॅशनल हेराल्डची ५ मजली ईमारत ज्याची किमत आज २००० करोड़ पेक्षा जास्त आहे ती सपूर्ण खाली करण्याचे आदेश दिले !
• देशभरात AJL ची ५००० करोड़ पेक्षा जास्त किमतीची संपत्ती मानली जाते.
असे एक ना अनेक कित्येक घोटाळे जे कधी प्रकाशात आलेच नसतील !
स्वातंत्र्या नंतर नॅशनल हेराल्ड आर्थिक संकटात असताना पंडित. जवाहरलाल नेहरु हे बोलले होते की “मी कोणत्याही परिस्थितिमधे नॅशनल हेराल्ड बंद पडू देणार नाही, भले त्यासाठी मला माझे आनंद भवन म्हणजेच राहते घर जरी विकावे लागले तरी बेहत्तर !
याचिकाकर्ते श्री. सुब्रमण्यम स्वामी यांच्यानुसार श्रीमती. गांधी व् श्री. राहुल गांधी यांनी तर नॅशनल हेराल्ड नुसते बंदच नाही तर हड़प करुन विकून खाल्ले आहे.
जेव्हा ह्या केसचा संपूर्ण निकाल गांधीविरोधात लागेल तेव्हा ह्या सगळ्या निर्भिड पत्रकार-बुधिवंतांची फौज न्यायव्यवस्थेवर देखिल चिखलफेक केल्याशिवाय राहणार नाही हे सद्य स्थितीतील ह्या सर्व मान्यवरांच्या कृतीतून दिसते आहे. शेवटी बाप- बड़ा न मैया, सबसे बड़ा रूपय्या हे का उगीच म्हटले आहे !
0 Comments