ढोंगी धर्मनिरपेक्षता - एक काटेरी मुकुट !

ढोंगी धर्मनिरपेक्षता - एक काटेरी मुकुट !ढोंगी धर्मनिरपेक्षता - एक काटेरी मुकुट !

भारताच्या  राजकीय महाभारतामध्ये सर्वात जास्त गैरवापर झालेला शब्द म्हणजे "धर्मनिरपेक्षता" ह्या शब्दाच्या आधारे जेवढे नीच राजकारण भारतात झाले असेल तेवढे क्वचितच कुणा दुसऱ्या मुद्द्यावर झाले आहे ! डावे पक्ष, काँग्रेस, समाजवादी आणि इतर यांनी ह्या शब्दाचा राजकीय बाजार मांडून अनेक नालायक राज्यकर्त्यांना सत्तेत बसवून समस्त सामान्य जनतेच्या हितांची वेळोवेळी हत्या केली आहे ! मग ती भ्रष्टाचाराच्या रूपाने असो अथवा सामाजिक सलोख्याच्या रूपाने ! ह्या सर्वांचे एक ठरलेले वाक्य आहे "सांप्रदायिक शक्तींना रोखण्यासाठी आम्ही समविचारी एक येत आहोत" मुळात  डावे पक्ष  व काँग्रेसेतर सर्व राजकीय  पक्षांचा जन्मच काँग्रेसच्या विरोधात झाला आहे ! परंतु विशेष धर्मसमुदायाच्या एकगठ्ठा मतदानावावर डोळा ठेवून सर्व पक्ष त्यांच्या जन्माच्या मूळ  उद्देशाचा निर्लज्जपणे कडेलोट  करत आले आहे. फक्त राजकीय पक्षचं नव्हे तर ह्या शब्दाचा वापर करून स्वतःला पुरोगामी अथवा उदारमतवादी म्हणवून घेणाऱ्या तथाकथित  बुद्धिवंत-विचारवंत-लेखक-पत्रकार-सामाजिक कार्यकर्ता श्रेणीतल्या कित्येकांनी आपले आर्थिक-सामाजिक-राजकीय हित साधण्यामध्ये कोणतीही कसूर ठेवलेली नाही ! ह्या शब्दाचा वापर करून ह्यांनी फक्त बहुसंख्यांकांचेच नुकसान केलेले नाही तर ज्या विशेष धर्मसमुदायाच्या एकगठ्ठा मतदानाच्या जोरावर वर्षो न वर्ष जगले त्यांचे देखील नुकसान अधिक केले आहे हे त्यांच्या आजच्या परिस्थितीचे प्रत्येक निकषानुसार जरी आकलन केले तरी लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आणि हे स्वीकार करण्यासाठी तुमचा बुद्धिवाद म्हणा अथवा  विवेकवाद कोणत्याही राजकीय पक्षाच्या अथवा फक्त लायकी नसतांना वारसाहक्काने मिळालेल्या श्रेष्ठत्वाच्या दावणीला बांधून चारा खात नसला पाहिजे !
मुळात धर्मनीरपेक्षता ही उदात्त संकल्पना कित्येक शतकांपासून भारताचा मूळ गाभा राहिलेली आहे आणि म्हणूनच ह्या देशात आजही अनेक धर्म-पंथ हे जगातील इतर कोणत्याही "तथाकथित" धर्मनिरपेक्ष देशापेक्षा अधिक आढळतात ! परंतु हि उदात्त संकल्पना ह्या लबाड सत्तापिपासू राजकीय पक्षांच्या आणि ढोंगी पुरोगामित्वाची शाल पांघरलेल्या काही लोकांमुळे बहुसंख्यांकांच्या डोक्यावरचा काटेरी मुकुट बनली आहे ! बहुसंख्यांकांचे पारंपारिक सण असो, उत्सव असो, महाकाव्ये-लेखन-प्राचीन ग्रंथ असो, प्राचीन शिक्षण-शास्त्रे असो, खेळ असो, धार्मिक श्रद्धा असो, कला-सांगीत असो अशा एक न अनेक उच्च मूल्यांवर हि मंडळी कळत-नकळत भामटेपणाने हल्ला चढवत असतात ! न्यायालयात ह्या मूल्यांच्या विरोधात याचिका टाकणे हा तर कित्येक ढोंगी धर्मनिरपेक्ष लोकांचा छंदच बनला आहे. भारतातच फक्त  धर्मनिरपेक्षता भामटेपणाने सर्वधर्मसमभाव ह्या गोंडस नावाखाली गैर-वापरात आणली जाते. सर्वधर्म समभाव म्हणजे प्रत्येक धर्मातील त्या त्या मान्यतांचा-मूल्यांचा आदर करणे आले, मग सर्वच धर्मात सर्व चांगले आहे का ? जर सर्वच धर्मात सर्वच चांगलं नाहीये तर हि सर्व भामटी मंडळी फक्त बहुसंख्यांकांच्या धर्मचिकेस्तेलाच हाथ का घालतात ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर यांच्या पासून ते हमीद दलवाई, नरहर कुरुंदकर ह्या सर्वांनी केलेली सर्व धर्मचिकित्सा ह्या तथाकथित बुद्धिवंतांनी अभ्यासली नाहीये का ? सांप्रदायिक शक्तींना रोखण्यासाठी हि धर्मनिरपेक्ष मंडळी राज्यसत्ता सोपवण्याचे आवाहन करतात ती मुळात सत्तेत आल्यानंतर सर्व धर्मांचे शैक्षणिक-आर्थिक-सामाजिक हित समानतेने जोपासतात का ? अल्पसंख्यांक आयोगाने तर ज्या राज्यात म्हणजेच (नागालँड ८.७५ %, मणिपूर ३१.३५ %, लक्षद्वीप २.५ %, मेघालय ११.५ %, मिझोराम २.७५ %, अरुणाचल प्रदेश २९ %, पंजाब ३८ %, जम्मू-काश्मीर २८ %) हिंदू अल्पसंख्यांक आहेत त्यांना अल्पसंख्यांक हा दर्जा व त्या अनुषंगाने मिळणारी सवलत देखील अजून दिलेली नाही ! 


2018 मध्ये मिझोरम सरकारचा  शपथविधी हा तर ख्रिश्चन धर्मग्रंथ बायबल मधील काही प्रार्थना म्हणून साजरा झाला होता !

२०१६ मध्ये उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यानी मुस्लिम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तर शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी १२.३० ते २ असा ९० मिनिटांचा स्पेशल ब्रेक जाहीर केला होता ! 


२००६ च्या ५२ व्या नॅशनल कॉउंसिल ऑफ डेव्हलोपमेंटच्या  बैठकीमध्ये बोलतांना तत्कालीन पंतप्रधान मा.मनमोहन सिंग म्हणाले होते कि देशातील संसाधनांवर पहिला हक्क हा मुस्लिमांचा आहे ! 
उजव्या विचारसरणीचा कोणताही राजकीय व्यक्ती बहुसंख्याकांच्या बाबतीत असे बोलला असता तर ? त्याची राजकीय कारकीर्द समस्त ढोंगी लोकांनी कधीच गिळंकृत केली असती.

काँग्रेसचे माजी "कायदामंत्री" सलमान खुर्शीद यांनी तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मुस्लिमांना सरकारी नोकरी आणि शिक्षणासाठी विशेष कोटा जाहीर केला होता, परंतु निवडणूक आयोगाने ह्यावर आक्षेप घेतला, तेव्हा उपस्थित जमावाला खुश करण्यासाठी एका प्रचार सभेत "कायदामंत्री" खुर्शीद साहेब म्हणाले होते "मला निवडणूक आयोगाने फाशी जरी दिली तरी मुस्लिम हक्कासाठी मी लढत राहील व मला कुणीच अडवू शकत नाही"  इतिहासात प्रथमच एका केंद्रीय मंत्र्याची तक्रार निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींकडे केली होती !

इथवरच साहेब थांबले नाही तर धार्मिक तुष्टीकरणासाठी ह्यांनी राष्ट्रीय सुरक्षेला सुद्धा गुंडाळून ठेवले होते ! एका प्रचार सभेत बोलतांना "कायदामंत्री" बोलले कि बाटला हॉऊस एन्काऊंटरची बातमी ऐकून श्रीमती सोनिया गांधी यांच्या डोळ्यात अश्रू आले होते ! भारतातील सर्वात प्रामाणिक राजकीय व्यक्तिमत्व मा. अरविंद केजरीवाल यांनी देखील फेक एन्काऊंटरची री ओढत आपले राजकीय हित  साधण्याचा प्रयत्न केला होता !  दिग्विजय सिंग यांचे "ओसामाजी" आणि "हाफिज सईद साहब" तर धार्मिक तुष्टीकरणासाठीची नीचतम पातळी होती !

असे एक न अनेक उदाहरण देता येतील !

काही वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रेदेखील हत्या-बलात्कार किंवा कोणत्याही अक्षम्य अशा गुन्ह्याचे अथवा महत्वाच्या बातमीचे वार्तांकन करतांना देखील आपल्या ढोंगी धर्मनिरपेक्षतेचे प्रदर्शन करत असतात ! 

जेव्हा गुन्हेगार हा बहुसंख्यांक धर्माचा असतो तेव्हा गुन्हा कोणत्या धर्माच्या व्यक्तीकडून झाला आहे हे अधोरेखित करण्याचा त्यांचा जास्तीत जास्त प्रयत्न असतो !

जेव्हा गुन्हेगार अल्पसंख्यांक असतो तेव्हा बातमी अशी असते !


जेव्हा गुन्हेगार बहुसंख्यांक असतो तेव्हा बातमी अशी असते !


धार्मिक व जातीय तुष्टीकरण करण्यामध्ये जणू ह्या सर्व मंडळी मध्येदेखील जोरदार स्पर्धा चालू आहे कि काय असे वाटते !

मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी एका सभेत एक अत्यंत "धर्मनिरपेक्ष" असे वक्तव्य केले "तिहेरी तलाक हा कुराणाचा आदेश असून ह्यात कोणतेही सरकार हस्तक्षेप करू शकत नाही" सुप्रीम कोर्टाने देखील तिहेरी तलाक हा अन्यायकारक असल्याचा निर्णय दिला आहे तो भाग वेगळा !

धर्मनिरपेक्ष राज्यसंस्था असे चित्र आपण डोळ्यासमोर जेव्हा उभे करतो तेव्हा राज्य हे कोणत्याही एका विशेष धर्माच्या आधारे अथवा धर्मासाठी अथवा धर्माचे नियंत्रण नसलेली राज्यसंस्था अपेक्षित असते, ह्यात सर्व धर्मीय नागरिकांचे हित एकाच तराजूमध्ये तोललेजाणे अपेक्षित असते. सर्व धर्माच्या जनते साठी समान शिक्षण-व्यवसाय-नोकरी-कायदा-संरक्षण अपेक्षित असते, परंतु दुर्दैवाने आपल्या देशात असे होतांना दिसत नाही आणि त्यामुळेच बहुसंख्यांकामधे अन्यायाची भावना दिवसेंदिवस तीव्र होत चालली असून याचा लाभ काही विखारी हिंतुत्ववादी संघटना घेतांना दिसतात ! सामाजिक एकतेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक अशी हि बाब आहे !

Post a Comment

2 Comments