Skip to main content

Posts

Showing posts from April, 2025

श्रीमद्भगवद्गीता अध्याय २ सांख्ययोग - स्वामी चिन्मयानंद टीका सारांश-दिवस २

  श्रीमद्भगवद्गीता अध्याय २ सांख्ययोग  - स्वामी चिन्मयानंद टीका सारांश-दिवस २ १ )जीवनातील परिस्थितींना आपल्यावर चाल करून देणे म्हणजे सर्व प्रसंगात आपल्या घातकी अपयशाची निश्चिती करण्यासाठी आहे. २ )कोणी लेचापेचा मनुष्यच परिस्थितीला स्वतःवर मात करू देतो आणि बाह्य परिस्थितीचा गुलाम बनतो. ३ )जीवनाची घडी यथायोग्य आखलेली असते तेव्हा अगदी प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा यशदायी अनुकूल  परिस्थितीत बदलता येते जीवनाच्या खडकाळ अशा मार्गावरून आपली गाडी सुबुद्ध व्यक्ती किती कौशल्याने हाकतो यावर सर्वकाही अवलंबून असते. ४ )जेव्हा आपला अहंकार अधिक व्यापक होऊन सेना आदर्श तत्त्व देश किंवा युगाशी तादात्म्य पावतो तेव्हा आपल्या नैतिक दुर्बळता क्षय पावतात. ५ )पूर्ण नैतिकतेचे जीवन अशाच व्यक्तीकडून जगले जाते ज्याने आत्मस्वरूपाची तादात्म्य साधले आहे जे एकमेव द्वितीय सर्वव्यापी सर्व नामरूपांमध्ये व्याप्त आहे. ६ )पूर्ण नैतिकतेचे जीवन अशाच व्यक्तीकडून जगले जाते ज्याने आत्मस्वरूपाची तादात्म्य साधले आहे जे एकमेव द्वितीय सर्वव्यापी सर्व नामरूपांमध्ये व्याप्त आहे. ७ )एकदा का आपण परिस्थितीचे चुकीचे मूल्यांकन के...

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १ अर्जुनविषादयोग - स्वामी चिन्मयानंद टीका सारांश-दिवस १

  श्रीमद्भगवद्गीता अध्याय १  अर्जुनविषादयोग - स्वामी चिन्मयानंद टीका सारांश-दिवस १  १ ) आपले हेतू जर अशुद्ध व अन्यायकारक असतील तर आपण कितीही सुसज्ज असलो तरी आपले मन निश्चितच साशंक व क्षुब्ध होते ! २ ) स्वतः केलेल्या पापकर्मामुळे अपराधीपणाच्या दडपणाने ज्याचे नीतिधैर्य पार खचून गेले आहे त्याच्या बोलण्यामध्ये साहजिकच ताळतंत्र राहत नाही ! अशा प्रचंड तणावाखाली जेव्हा मनुष्य असतो तेव्हा त्याच्या मनाची खरी सांस्कृतिक पातळी दिसून येते ! ३ ) ज्याच्या मनामध्ये नीच हेतू आहेत व ज्याचे वर्तन कपटी आहे त्याच्या मनात भीती निर्माण होणे स्वाभाविक असते ! ४ ) जेव्हा आपण स्वतः चांगले नसतो तेव्हा आपला सगळं दुष्टपणा व वाईटपणा आपण आपल्या कनिष्ठांवर लादत असतो ! ५ ) स्वतःच्या दुबळेपणास सोईस्करपणे काहीतरी पवित्र नाव देऊन त्याचे कौतूक करत राहणे हि मानवी प्रवृत्ती  असते ! एखाद्या श्रीमंत माणसाने स्वतःच्या नावाने देऊळ बांधले कि त्याच्या त्या पोकळ अहंमान्यतेला दानधर्म असे चुकीचे नाव दिले जाते ! ६ )  मनोव्याधीं रुग्णाला जेव्हा बोलू दिले जाते तेव्हा त्याच्या व्याधीचे कारण तो नेमका नकारात्मक भाष...

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १ अर्जुनविषादयोग - स्वामी रामसुखदास टीका सारांश-दिवस १

 श्रीमद्भगवद्गीता अध्याय १  अर्जुनविषाद योग  स्वामी रामसुखदास टीका सारांश-दिवस १  १ ) संसारात प्रामुख्याने भूमी ,  धन ,  स्त्री या ३  गोष्टीसाठीच लढाया होतात ! २ ) कोणतेही कर्म धर्माला अनुसरुनच करावे ! ३ ) जे भाव अंतकरणात असतात तेच वाणीतून प्रकट होतात ! ४ ) द्वैत भावनेनेंच आपसात प्रेम - स्नेह राहत नाही ! ५ ) ज्याच्याशी आपली विशेष प्रीती नाही त्याच्याकडून आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी मनुष्य त्याला जास्त आदर देऊन खुश करतो ! ६ ) अधर्मी - अन्यायी - पापी व्यक्ती कधीही निर्भय आणि सुख शांतीयुक्त राहू शकत नाही ! ७ ) ज्यांच्या ठिकाणी नाशवंत धन - संपत्तीचा आश्रय आहे व ज्यांच्या हृदयात अधर्म -अन्याय - दुर्भावना आहे ते बलहीन असतात व अंतःकरणातून घाबरलेले असतात ! ८ ) भौतिक सुखांना महत्व देऊन आणि संयोगजन्य सुखाच्या प्रलोभनात फसून कधीही अधर्माचा आश्रय घेऊ नये ! ९ ) आपणाकडून आपल्या शरीर - मन - वाणी याद्वारे कधीही अन्याय व अधर्म होऊ देऊ नये कारण याने आपले हृदय बलहीन होते ! १ ० )   मनुष्य कोठेही असो कोणत्याही परिस्थितीमध्ये असो त्याच प्राप्त स्थितीमध्ये राहून ...