श्रीमद्भगवद्गीता अध्याय १ अर्जुनविषादयोग - स्वामी रामसुखदास टीका सारांश-दिवस १

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १ अर्जुनविषादयोग - स्वामी रामसुखदास टीका सारांश-दिवस १

 श्रीमद्भगवद्गीता अध्याय १  अर्जुनविषाद योग 

स्वामी रामसुखदास टीका सारांश-दिवस १ 

१ ) संसारात प्रामुख्याने भूमी ,  धन ,  स्त्री या ३  गोष्टीसाठीच लढाया होतात !

२ ) कोणतेही कर्म धर्माला अनुसरुनच करावे !

३ ) जे भाव अंतकरणात असतात तेच वाणीतून प्रकट होतात !

४ ) द्वैत भावनेनेंच आपसात प्रेम - स्नेह राहत नाही !

५ ) ज्याच्याशी आपली विशेष प्रीती नाही त्याच्याकडून आपला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी मनुष्य त्याला जास्त आदर देऊन खुश करतो !

६ ) अधर्मी - अन्यायी - पापी व्यक्ती कधीही निर्भय आणि सुख शांतीयुक्त राहू शकत नाही !

७ ) ज्यांच्या ठिकाणी नाशवंत धन - संपत्तीचा आश्रय आहे व ज्यांच्या हृदयात अधर्म -अन्याय - दुर्भावना आहे ते बलहीन असतात व अंतःकरणातून घाबरलेले असतात !

८ ) भौतिक सुखांना महत्व देऊन आणि संयोगजन्य सुखाच्या प्रलोभनात फसून कधीही अधर्माचा आश्रय घेऊ नये !

९ ) आपणाकडून आपल्या शरीर - मन - वाणी याद्वारे कधीही अन्याय व अधर्म होऊ देऊ नये कारण याने आपले हृदय बलहीन होते !

१ ० )   मनुष्य कोठेही असो कोणत्याही परिस्थितीमध्ये असो त्याच प्राप्त स्थितीमध्ये राहून तो निष्काम होवून परमात्मा प्राप्ती करू शकतो !

१ १ ) काम - क्रोध - लोभ हे ३  नरकाचे द्वार आहेत ! वास्तविक हि ३  एका काम याचीच रूपे आहे ! कामनेची २  प्रकारे क्रिया होते १ = इष्ट प्राप्ती २ = अनिष्ट निवृत्ती ! इष्टाच्या प्राप्तीचे २  प्रकार आहे १ ) संग्रह २ ) सुख भोगणे 

१ २ ) संग्रहाच्या इच्छेला लोभ म्हणतात व सुखभोगाच्या इच्छेला काम म्हणतात !

१ ३ ) अनिष्टाच्या निवृत्तीत अडचण आली तर क्रोध निर्माण होतो 

१ ४ ) आततायी ६  प्रकारचे असतात ! १ = आग लावणारा २ = विष देणारा ३ = शस्त्र घेऊन हल्ला करणारा ४ =संपत्ती हरण करणारा ५ = स्त्री हरण करणारा ६ = खून करणारा ! ह्यांच्या हत्येला अधर्म नाही समजले जात !

१ ५ ) ज्या ठिकाणी लढाई होते तिथे समय - शक्ती - संपत्ती यांचा नाश होतो ! 

१ ६ ) वस्तूंचा संयोग होऊन वियोग होणे जास्त सुखदायी असते ! 

१ ७ ) ज्या वस्तूंचा आत्ता अभाव आहे त्यांची प्रारब्धानुसार प्राप्ती जरी झाली तरी शेवटी त्याचा अभावच राहणार आहे !

१ ८ ) लोभामुळे वस्तू प्राप्ती साठी अथक परिश्रम व दुःख भोगावे लागतात , वस्तू प्राप्ती संयोगाने थोडे सुख भेटते परंतु पुन्हा अभाव झाल्याने दुःख प्राप्त झाले ! हे सगळे लोभामुळे झाले !

१ ९ ) अंतःकरणात लोभ नसेल तर वस्तू संयोगाने सुख होणारच नाही ! मोहरूपी दोष नसेल कुटूंबियापासून सुख होऊच शकत नाही ! संसाराचे सुख दोषाशिवाय शक्य नाही ! 

२ ० ) इतरांच्या दोषदृष्टीमुळे आपला अभिमान तीव्र होतो व स्वतःचे दोष दिसेनासे होतात !

२ १ ) मनुष्य ज्या स्थिती व श्रेणीमध्ये असतो त्याला तो ठीकच समजत असतो ! त्याहून उच्च श्रेणीला तो समजू शकत नाही !


Ganesh K Avasthi
Blog Admin


 

Post a Comment

0 Comments