श्रीमद्भगवद्गीता अध्याय १ अर्जुनविषादयोग - स्वामी चिन्मयानंद टीका सारांश-दिवस १

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १ अर्जुनविषादयोग - स्वामी चिन्मयानंद टीका सारांश-दिवस १

 

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १  अर्जुनविषादयोग - स्वामी चिन्मयानंद टीका सारांश-दिवस १ 

१ ) आपले हेतू जर अशुद्ध व अन्यायकारक असतील तर आपण कितीही सुसज्ज असलो तरी आपले मन निश्चितच साशंक व क्षुब्ध होते !

२ ) स्वतः केलेल्या पापकर्मामुळे अपराधीपणाच्या दडपणाने ज्याचे नीतिधैर्य पार खचून गेले आहे त्याच्या बोलण्यामध्ये साहजिकच ताळतंत्र राहत नाही ! अशा प्रचंड तणावाखाली जेव्हा मनुष्य असतो तेव्हा त्याच्या मनाची खरी सांस्कृतिक पातळी दिसून येते !

३ ) ज्याच्या मनामध्ये नीच हेतू आहेत व ज्याचे वर्तन कपटी आहे त्याच्या मनात भीती निर्माण होणे स्वाभाविक असते !

४ ) जेव्हा आपण स्वतः चांगले नसतो तेव्हा आपला सगळं दुष्टपणा व वाईटपणा आपण आपल्या कनिष्ठांवर लादत असतो !

५ ) स्वतःच्या दुबळेपणास सोईस्करपणे काहीतरी पवित्र नाव देऊन त्याचे कौतूक करत राहणे हि मानवी प्रवृत्ती  असते ! एखाद्या श्रीमंत माणसाने स्वतःच्या नावाने देऊळ बांधले कि त्याच्या त्या पोकळ अहंमान्यतेला दानधर्म असे चुकीचे नाव दिले जाते !

६ )  मनोव्याधीं रुग्णाला जेव्हा बोलू दिले जाते तेव्हा त्याच्या व्याधीचे कारण तो नेमका नकारात्मक भाषेतच सांगत असतो !

७ ) आपल्या अज्ञानांमुळे दिव्य स्वरूपाला नित्य आत्मतत्वाला जीव समजणे हेच पाप आहे. आपण शरीर - मन - बुद्धीच्या स्तरावर वागणे म्हणजे मनुष्याच्या प्रतीष्ठेला धरून नव्हे तर हि पशु वृत्ती होय !

८ ) जी कर्मे केली असता व ज्या प्रवृत्ती मनात बाळगल्या असता स्थूल मनोवासना निर्माण होतात व त्यामुळे सत्यत्वाची ओळख करून घेण्यास अडसर निर्माण होतो त्या सर्वाना पाप असे म्हणतात !

९ ) धर्मग्रंथांचे जाणूनबुजून निंदा करणार्यापेक्षा पवित्र ग्रंथांचा योग्य अर्थ न जाणता चुकीचा अर्थ करणारे जास्त गुन्हेगार होय !

१ ० ) पापकर्माना सक्रिय विरोध हा श्रीकृष्णांच्या विचाराचा सार आहे !

१ १ ) हिंदुधर्म म्हणजे समाजामध्ये अध्यात्मिक संस्कृती जोपासणे व कार्यन्वित करणे ह्याचे तंत्र आहे !

१ २ ) योग हा शब्द युज म्हणजे जोडणे या धातूपासून तयार झाला आहे. व्यक्तीने आपले सध्याचे व्यक्तिमत्व उंचावून ते अधिक उंचावून व परिपूर्ण ध्येयाशी तादात्म्य करण्याचा प्रयत्न म्हणजे योग होय !


Ganesh K Avasthi
Blog Admin




Post a Comment

0 Comments