ग्रंथ परिचय : पातंजल योगदर्शन : अध्याय १ : साधनपाद : कै.कृष्णाजी केशव कोल्हटकर : दिवस १० सारांश लेखन : गणेश किशोर अवस्थी क्रियान्तरासक्तिमपास्य कीटको ध्यायन्नलित्वं ह्यलिभावमृच्छति। तथैव योगी परमात्मतत्त्वं ध्यात्वा समायाति तदेकनिष्ठया॥ श्लोक ३५९ - विवेकचूडामणी - आदिशंकराचार्य अर्थ : ज्याप्रमाणे कीटक इतर सर्व क्रिया टाकून देवून भ्रमराचेच ध्यान करीत राहिल्यामुळे स्वतःच भ्रमर होतो, त्याचप्रमाणे योगी एकनिष्ठ राहून परमतत्वाचे ध्यान करीत असता स्वतः परमात्माच बनतो ! साधनपाद: तपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि क्रियायोगः॥२.१॥ समाधिभावनार्थः क्लेशतनूकरणार्थश्च॥२.२॥ अविद्यास्मितारागद्वेषाभिनिवेशाः क्लेशाः॥२.३॥ अविद्याक्षेत्रमुत्तरेषां प्रसुप्ततनुविच्छिन्नोदाराणाम्॥२.४॥ अध्याय २ : साधनपाद : सारांश १) चित्तशुद्धी व्हावी एवढ्या एकाच हेतूने शरीर - वाणी - मन यांच्यावर ठेवलेले नियंत्रण हे तप होय ! २) मंत्रांचा जप, शास्त्राचा अभ्यास हा स्वाध्याय होय ! ३) आपली सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करून करणे म्हणजे ईश्वरप्रणिधान होय ! ४) तप - स्वाध्याय - ईश्वरप्रणिधान ह्यांचे सदा सर्वदा आचरण...
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू !