Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

भारतीय "चळवळ-आंदोलन-मोर्चे-सत्याग्रह" !

भारतीय "चळवळ-आंदोलन-मोर्चे-सत्याग्रह"    भारतातील अथवा जगातील बहुतांशी तथाकथित "चळवळ-आंदोलन-मोर्चे-सत्याग्रह" हे छुप्या राजकीय महत्वकांक्षेने प्रेरित असतात ! त्यांना जनहित-समाजहित यांचा मुलामा चढविन्यासाठी जनतेच्या मनातील भावनीक क्षुब्धता ओळखायची असते व त्या विषयाला धरून तथाकथित "चळवळ-आंदोलन-मोर्चे-सत्याग्रह" यांची राळ समाजमाध्यमे - प्रिंट मीडिया - इलेक्ट्रॉनिक मीडिया - समाजिक संस्था यांच्याद्वारे उडविणे क्रमप्राप्त ठरते ! जनतेला देखील स्वतःच्या क्षुब्धतेला शांत करण्यासाठी काहीतरी सनसनाटी व्हावे अशी सुप्त ईच्छा असते व जनतादेखील काहीशा प्रमाणात ह्या न त्या मार्गाने आपला सहभाग नोंदवत आपली ईच्छापुर्ती करत असते !    सर्व गणिते ठरविल्या गेलेल्या योजनेप्रमाणे योग्य जुळून जर आली तर ज्या छुप्या राजकीय महत्वकांक्षेने ही तथाकथित "चळवळ-आंदोलने-मोर्चे-सत्याग्रह" सुरू करण्यात आली होती त्याला फळप्राप्ती ही सत्ताबदलच्या रूपाने मिळते ! चळवळकर्ते एकदा राज्यकर्ते बनले की त्या चळवळीचा जनहित-समाजहिताचा मुखवटा कालांतराने हटवला जातो ! भविष्यातील आव्हानांना सुरवातीलाच ...

सेंट्रल विस्टा झालेच पाहिजे, परंतु....

दिल्लीतील सेंट्रल विस्टा २०,००० कोटी अथवा मुंबईतील आमदार निवास ९०० कोटी ह्या दोन्ही प्रकल्पांच्या विरोधात अथवा समर्थनात मला काही लिहायचे नाही परंतु माझ्या काही कल्पना आहे ज्या फक्त ह्या दोनच नव्हे देशभरातील खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी यांच्यासाठी भविष्यातील देखील निर्माण केल्या जाणाऱ्या निवासस्थान - कार्यालयीन प्रकल्पात जर अंमलात आणल्या गेल्या तर फार छान होईल !  लोकप्रतिनिधी (खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी) सर्व निर्माणाधिन व भविष्यातील नियोजित कार्यालये,  निवासस्थान, विश्रामगृह, ई. प्रकल्पात खालीलप्रमाणे नियोजन करण्यात यावे ! १) कोरोनाने देशभरातील दुर्दवी मृत्यू झालेल्या सर्व जनतेची नावे संबंधित इमारतीवर कोरले जावे ! २) ज्या दुर्दैवी व्यक्तींचे मृत्यू रुग्णालयांच्या पायऱ्यांवर झाले त्यांची नावे त्या इमारतींच्या पायऱ्यावर कोरण्यात यावी ! ३) ज्या दुर्दैवी व्यक्तींचे मृत्यू गाडीत, रिक्षात, रुग्णावाहिकेत, सायकलवर, लोटगाडीवर अथवा ज्या ज्या वाहनात झाले त्यांची नावे व ज्यांना मृत्यूनंतर देखील शववाहिका उपलब्ध नाही झाली व त्यामुळे त्यांच्या मृतदेहाचीदेखील हेटाळणी झाली अशी समस्त...