सेंट्रल विस्टा झालेच पाहिजे, परंतु....

सेंट्रल विस्टा झालेच पाहिजे, परंतु....



दिल्लीतील सेंट्रल विस्टा २०,००० कोटी अथवा मुंबईतील आमदार निवास ९०० कोटी ह्या दोन्ही प्रकल्पांच्या विरोधात अथवा समर्थनात मला काही लिहायचे नाही परंतु माझ्या काही कल्पना आहे ज्या फक्त ह्या दोनच नव्हे देशभरातील खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी यांच्यासाठी भविष्यातील देखील निर्माण केल्या जाणाऱ्या निवासस्थान - कार्यालयीन प्रकल्पात जर अंमलात आणल्या गेल्या तर फार छान होईल ! 

लोकप्रतिनिधी (खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी)

सर्व निर्माणाधिन व भविष्यातील नियोजित कार्यालये,  निवासस्थान, विश्रामगृह, ई. प्रकल्पात खालीलप्रमाणे नियोजन करण्यात यावे !

१) कोरोनाने देशभरातील दुर्दवी मृत्यू झालेल्या सर्व जनतेची नावे संबंधित इमारतीवर कोरले जावे !

२) ज्या दुर्दैवी व्यक्तींचे मृत्यू रुग्णालयांच्या पायऱ्यांवर झाले त्यांची नावे त्या इमारतींच्या पायऱ्यावर कोरण्यात यावी !

३) ज्या दुर्दैवी व्यक्तींचे मृत्यू गाडीत, रिक्षात, रुग्णावाहिकेत, सायकलवर, लोटगाडीवर अथवा ज्या ज्या वाहनात झाले त्यांची नावे व ज्यांना मृत्यूनंतर देखील शववाहिका उपलब्ध नाही झाली व त्यामुळे त्यांच्या मृतदेहाचीदेखील हेटाळणी झाली अशी समस्त दुर्दैवी नावे लोकप्रतिनिधींच्या अलिशान वाहनांवर कोरण्यात यावी !

४) ज्या दुर्दैवी व्यक्तींचे मृत्यू हे रुग्णांलयातील लागलेल्या आगीमुळे झाले त्यांची नावे स्नानगृहात कोरण्यात यावी !

५) ज्या दुर्दैवी व्यक्तींचे मृत्यू ऑक्सिजन अभावी झाले त्यांची नावे इमारतीच्या समस्त प्रकारच्या वातानुकूलित सुविधांवर कोरण्यात यावी !

६) सोशल मीडियावर तत्काळ  मदत मिळावी यासाठी संदेशाचे जे महापूर आहेत ते सर्व प्रिंट करून इमारतींच्या गार्डन व मनोरंजनासाठी असलेल्या सुविधांच्या जागेवर लावण्यात यावे !

७) ज्या दुर्दैवी व्यक्तींचे मृत्यू इंजेक्शन, औषध अभावी झाले त्यांची नावे त्या त्या इमारतीच्या उपहारगृहामध्ये व सर्व थाळ्यावर कोरण्यात यावी !

८) ज्या दुर्दैवी व्यक्तींचे मृत्यू निराशा-उपासमारी-बेरोजगारी-व्यवसायांतील नुकसान अथवा इतर कारणांनी आत्महत्यामुळे झाले असतील त्यांची नावे लोकप्रतिनिधींच्या शयनगृहात कोरण्यात यावी !

९)घरातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्युमुळे अनाथ झालेल्या मुलांची, वृद्धांची नावे लोकप्रितिनिधींना दिल्या जाणाऱ्या मासिक पगार व निवृत्तीनंतर देण्यात येणाऱ्या भविष्यनिर्वाह निधीसोबत कायम देण्यात यावे !

अजून काही सूचना असतील तर तुम्ही सुचवू शकता !

शेवट एका इतिहासकाराच्या मार्मिक वाक्याने....

कोणत्याही राष्ट्रांकडे इतका मोठा झेंडा नसतो की तो त्या देशाच्या निर्दोष नागरिकांच्या मृत्यूमुळे जाणाऱ्या अब्रूला झाकू शकेल !

- हावर्ड ज़िन - ( इतिहासकार)


©निर्भीड.कॉम



Post a Comment

0 Comments