भारतीय "चळवळ-आंदोलन-मोर्चे-सत्याग्रह" !

भारतीय "चळवळ-आंदोलन-मोर्चे-सत्याग्रह" !

most of the time indian protests having hidden agenda !

भारतीय "चळवळ-आंदोलन-मोर्चे-सत्याग्रह" 


 भारतातील अथवा जगातील बहुतांशी तथाकथित "चळवळ-आंदोलन-मोर्चे-सत्याग्रह" हे छुप्या राजकीय महत्वकांक्षेने प्रेरित असतात ! त्यांना जनहित-समाजहित यांचा मुलामा चढविन्यासाठी जनतेच्या मनातील भावनीक क्षुब्धता ओळखायची असते व त्या विषयाला धरून तथाकथित "चळवळ-आंदोलन-मोर्चे-सत्याग्रह" यांची राळ समाजमाध्यमे - प्रिंट मीडिया - इलेक्ट्रॉनिक मीडिया - समाजिक संस्था यांच्याद्वारे उडविणे क्रमप्राप्त ठरते ! जनतेला देखील स्वतःच्या क्षुब्धतेला शांत करण्यासाठी काहीतरी सनसनाटी व्हावे अशी सुप्त ईच्छा असते व जनतादेखील काहीशा प्रमाणात ह्या न त्या मार्गाने आपला सहभाग नोंदवत आपली ईच्छापुर्ती करत असते !   

सर्व गणिते ठरविल्या गेलेल्या योजनेप्रमाणे योग्य जुळून जर आली तर ज्या छुप्या राजकीय महत्वकांक्षेने ही तथाकथित "चळवळ-आंदोलने-मोर्चे-सत्याग्रह" सुरू करण्यात आली होती त्याला फळप्राप्ती ही सत्ताबदलच्या रूपाने मिळते ! चळवळकर्ते एकदा राज्यकर्ते बनले की त्या चळवळीचा जनहित-समाजहिताचा मुखवटा कालांतराने हटवला जातो ! भविष्यातील आव्हानांना सुरवातीलाच छाटने गरजेचे असते ह्या राजकारणाच्या गुप्त नियमानुसार चळवळी मध्ये महत्वाचे शिलेदार म्हणून सोबत असलेल्या जोडीदारांना हळूच बाजूला सारणे गरजेचे असते ! जनता पुन्हा आपल्या जुन्या म्हणजेच मूर्ख बनल्याच्या भूमिकेत परतते !

चळवळ-आंदोलन-मोर्चे-सत्याग्रह मृत पावतात ! त्यांच्या हेतूंचा सत्ताप्राप्ती नंतर सोयीने विसर पडतो ! 

आणि जर ह्या चळवळींचे गणित चुकले तर ?? सत्ताप्राप्ती चुकते ! नवीन विषयांची प्रतीक्षा केली जाते ! जर असे विषय उपस्थित नसतील तर विषय तयार केले जातात व आधी सांगितल्याप्रमाणे चक्र फिरत राहते ! सत्ताबदल होत राहतात परंतु व्यवस्था तशीच राहते !

बाकी राजकीय महत्वकांक्षा नसलेल्या "चळवळ-आंदोलन-मोर्चे-सत्याग्रह" कोणते हे ओळखण्यासाठीची सुज्ञता जनतेच्याच ठायी असणे आवश्यक असते ! जी फार दुर्मिळ असते !


©निर्भीड.कॉम

   देव अवस्थी

   २३-५-२०२१


#मराठी #मराठीत #मराठीभाषा #ब्लॉग #निर्भि

Post a Comment

0 Comments