SHRI. NARAYAN DABHADAKR, WHO WINS TO DEATH !

SHRI. NARAYAN DABHADAKR, WHO WINS TO DEATH !

 कलीयुगातील मृत्युंजयी !

कलयुगीन_मृत्युंजयी

नागपूर येथील रा.स्व.संघाचे 85 वर्षीय श्री. नारायण दाभाडकर हे कोरोनाने बाधित होते व त्यांच्यावर रुग्णालयात उपचारदेखील सुरू होते ! ते ज्या रुग्णालयात दाखल होते तिथे एक महिला  चाळीशीच्या वयातील एका रुग्णासाठी ऑक्सिजन बेड मिळावा म्हणून धावपळ करतांना त्यांच्या निदर्शनास आले ! त्यांनी या संपूर्ण घटनेला पाहून काय निर्णय घेतला असेल ?? ह्या 85 वर्षाच्या आजोबांनी घेतलेला निर्णय आजच्या काळात हा आपल्याला त्याग,समर्पण,सेवा काय असते हे शिकवून जाते ! आजोबांनी डॉक्टरांना बोलावून घेतले व सांगितले की मी माझे आयुष्य जगलो आहे, परंतु हा तरुण आहे जो जगला पाहिजे, माझा बेड ह्या तरुणाला द्या व त्याला जगवा ! आले न अंगावर काटे ! बसमध्ये प्रवास करतांना धडधाकट लोक आपली जागासुद्धा कुणाला लवकर देत नाही तिथे ह्या आजोबांनी आपल आयुष्यच त्या तरुणाला अर्पण करून टाकले ! आजोबांना घरच्यांनी व डॉक्टरांनी खूप संमजविण्याचा प्रयत्न केला परंतु आजोबांनी काही ऐकले नाही व आपला बेड आजोबा त्या तरुणाला देऊन घरी गेले !
परिणाम अपेक्षितच होता ! आजोबांचा घरी मृत्यू झाला !

जेव्हा ही घटना कळली तेव्हा एकच वाक्य मनात उमटले ! कलियुगीन मृत्युंजयी !
खरतर आजोबांनी मृत्युला देखील जिंकलच आहे ! 

आज जी परिस्थिती आपण सगळीकडे पाहत आहोत ती कोणत्याही संवेदनशील माणसाच्या हृदयावर आघात करणारी आहे मग ती रुग्णांलयांची लूटमार, औषधांची काळाबाजारी, बेडसाठीची  वशिलेबाजी, लसीसाठीची वणवण, ऑक्सिजन साठीची ससेहोलपट, असंवेदनशील, मुर्दाड व नाकर्त्या राजकारण्यांची ह्याही परिस्थितील राजकारणाची किळसवाणी धडपड व तेही का कमी म्हणून त्यांच्या चपला अभिमानाने डोक्यावर मिरवत त्यांची पाठराखण करण्यात त्यांच्या पाळीव कार्यकर्त्यांची असलेली व्यस्तता हे सगळंच फार क्लेशदायक आहे ! परंतु आजोबांच्या त्यागासारखी घटना असो, अंधमातेच्या मुलाचा जीव वाचविणाऱ्या मुयर शेळकेच धाडस असो अथवा कोलकात्याच्या डॉ. फुआद हलीम यांचे कार्य असो अशा घटना घडतात व त्या कोलमडत चाललेल्या हृदयाला एक उभारी मिळते ! ह्या घटना प्रत्येक संवेदनशील माणसाच्या मनावरील दाटलेले निराशेचे मळभ दूर करतात व जगण्याच्या नवीन दिशा दाखवतात !

आजोबा आम्ही तुमच्याइतका त्याग करू शकू का नाही हे मला माहित नाही, परंतु ह्याच्या 1 टक्के जरी आम्ही करू शकलो तरी जन्म सार्थक होईल !

तुम्हाला शतशत नमन !
💐💐💐💐💐💐

देव अवस्थी !

#मराठी #मराठीत #निर्भीड #ब्लॉग

Post a Comment

0 Comments