#चोर_माणूस
हरियाणा मधे एका हॉस्पिटलमधून कोविड लसच्या कूप्या चोरीला गेल्या !
परंतु चोराला याची कल्पना नव्हती की त्याने जे चोरल आहे ती कोरोना लस आहे. परंतू जेव्हा त्याच्या लक्षात आल की ह्या कोरोंनाच्या लस आहे तेव्ह्य त्याने तो सर्व मुद्देमाल एका चिट्ठीसह पोलिस स्टेशन मधे सुपुर्द केला !
ज्यात त्याने माफी मागितली आहे हे नमूद करून की त्याला माहीत नव्हते की ह्या कोरोंनाच्या लस आहेत !
एका चोराला देखील कोरोंनाच्या भीषणतेची व त्यामुळे होणाऱ्या सर्वच जनतेच्या हालअपेष्टाची जाणीव आहे जी समाजातील पांढरपेशा म्हणून मिरवीणाऱ्या परंतु ह्या संकटाच्या काळात देखील जनतेची लूट करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या मग ते औषधांचा काळा बाजार करणारे असो, अव्वाच्या सव्वा बिले लावणारी रुग्णालय असो, खोटे रिपोर्ट बनवीणारे लैब्स असो अथवा
रेमेडेसिविर इंजेक्शन मधे पाणी भरून विकणारे कुठल्याही पक्षाची टुकार कार्यकर्ते असो अथवा आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलूंन जनतेची पिळवणुक करणाऱ्या नालायक राज्यकर्ते असो यांना नाहीये ! ही पांढरपेशा लोकांची यादी फार मोठी होऊ शकते !
असो चोरातल्या माणसाच कौतुक तर झालच पाहिजे !
#मराठी #मराठीत #ब्लॉग #निर्भिड
© Https://nirbhid.com
0 Comments