Dr. Fuad Halim ! True Hero who donates plasma for 7 times !

 #डॉक्टररूपी_देव डॉ. फुआद हलीम, कलकत्ता !

Fuad_Halim

१ नाही, २ नाही , तब्बल ७ वेळा प्लाज्मा दान करून २१ गंभीर कोरोना रुग्णांचे प्राण वाचविणारा देवदूत !

डॉ. फूआद हे कलकत्ता येथे स्वास्थ्य संकल्प नावाचे आरोग्यकेंद्र चालवितात ! मागील वर्षी ते स्वतः कोरोनावर मात करुन स्वस्थ झाले ! मागील लॉकडाऊन काळात जनतेची होणारी आर्थिक ससेहोलपट पाहुन त्यांनी आपली चिकित्सा फी ३५० रु वरुन फक्त ५० रु केली व तब्बल ६२३१ रुग्णांनी याचा लाभ घेतला !

हे महाशय इथेच थांबले नाही ! तर त्यांनी मागील वर्षांपासून आतापर्यंत तब्बल ७ वेळेस आपला प्लाजमा दान करून २१ गंभीर कोरोना रुग्णांना जीवनदान दिले आहे !

आपल्या ह्या अतुलनीय कार्याची कुठल्याही प्रकारची देखावीबाजी नाही, जाहिरात नाही, स्वार्थ नाही  !

असे एक न अनेक कर्तृत्ववान व्यक्ती आपल्या समाजात आपल्या अवतीभोवती आहेत ज्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे ! 

ह्यांना प्रसिद्धी तर मिळालीच पाहिजे !

सलाम डॉ. फुआद हलीम तुमच्या कार्याला !


#मराठी #मराठीत #ब्लॉग #निर्भीड


© https://nirbhid.com

Comments