Posts

Showing posts from March, 2019

ढोंगी धर्मनिरपेक्षता - एक काटेरी मुकुट !

Image
ढोंगी धर्मनिरपेक्षता - एक काटेरी मुकुट ! भारताच्या  राजकीय महाभारतामध्ये सर्वात जास्त गैरवापर झालेला शब्द म्हणजे "धर्मनिरपेक्षता"  ह्या शब्दाच्या आधारे जेवढे नीच राजकारण भारतात झाले असेल तेवढे क्वचितच कुणा दुसऱ्या मुद्द्यावर झाले आहे ! डावे पक्ष, काँग्रेस, समाजवादी आणि इतर यांनी ह्या  शब्दाचा राजकीय बाजार मांडून अनेक नालायक राज्यकर्त्यांना सत्तेत बसवून समस्त सामान्य जनतेच्या हितांची वेळोवेळी हत्या केली आहे ! मग ती भ्रष्टाचाराच्या रूपाने असो अथवा सामाजिक सलोख्याच्या रूपाने ! ह्या सर्वांचे एक ठरलेले वाक्य आहे "सांप्रदायिक शक्तींना रोखण्यासाठी आम्ही समविचारी एक येत आहोत" मुळात  डावे पक्ष  व काँग्रेसेतर सर्व राजकीय  पक्षांचा जन्मच काँग्रेसच्या विरोधात झाला आहे  ! परंतु विशेष धर्मसमुदायाच्या  एकगठ्ठा मतदानावावर डोळा ठेवून सर्व पक्ष त्यांच्या जन्माच्या मूळ  उद्देशाचा  निर्लज्जपणे  कडेलोट  करत आले आहे. फक्त राजकीय पक्षचं नव्हे  तर ह्या शब्दाचा वापर करून  स्वतःला पुरोगामी अथवा उदारमतवादी म्हणवून घेणाऱ्या तथाकथित  बुद्धिवंत-विचारवंत-लेखक-पत्रकार-सामाजिक कार्यकर्ता