प्रकृती समतोल राखणे जाणते !

प्रकृती समतोल राखणे जाणते !

प्रकृती समतोल राखणे जाणते !



आपणच अती महान आहोत व बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण काहीही करू शकतो ह्या मानवाच्या अहंकारामुळे प्रकृतीमध्ये जे पाशवी अतिक्रमण केले गेले आहे त्याला प्रकृती आपल्या परीने गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती स्वरूपात पदोपदी उत्तर देत आहे ! अज्ञान व अघोरी हव्यासापोटी जर प्रकृतीचे हे संकेत ओळखण्यास अजून नकार दिला गेला तर प्रकृती उत्तमरित्या जाणते की सृष्टीचे संतुलन कसे राखले जाते ! मूर्ख व अज्ञानी मानवाला वेळीच सावध व्हावे लागेल व आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी प्रकृतीमधील अतिक्रमण त्वरित थांबवावे लागेल अन्यथा प्रकृती समोर आपण किती क्षुद्र आहोत हे आपल्या अनुभवास आणून देण्यासाठी प्रकृतीस 1 मिनिट देखील पुरेसा आहे व त्यासाठी  प्रकृतीला काही बाजारू पर्यावरणवाद्यांची काहीही आवश्यकता नाही !
सद्विवेक बुद्धीचा अभाव असलेल्या पशूंमध्ये देखील ह्या प्रकृतिबद्दलचा आदर हा मानवापेक्षा  अधिक दिसून येतो ही बाब बुद्धिमत्तेचा टेंभा मिरविणाऱ्या मानवासाठी एक संकेत आहे की हे तुच्छ मानवा तू पशुपेक्षाही हिन आहेस कारण ज्या सद्विवेक बुद्धीच्या वरदानामुळे तू पशु पेक्षा वेगळा समजला जातोस तीच तू वापरत नाहीयेस !


देव अवस्थी !
निर्भीड.कॉम
३० जुलै २०२१

Post a Comment

0 Comments