मत कोणाला ? दुर्जन होतील शिरजोर । आपुल्या मताचा मिळता आधार । सर्व गावांस करितील जर्जर । न देता सत्पात्री मतदान ॥ - तुकडोजी महाराज - प्रत्येक विवेकशील व सुज्ञास पडलेला गंभीर असा प्रश्न ! कि मत कोणाला ? चला मी तुमची थोडी मदत करतो ! आणि हो महत्वाचे म्हणजे हा लेख विवेकशील व सुज्ञ मतदारांसाठी आहे ! जात - धर्म - पंथ - प्रांत - भाषा अशा अनेक पशुतुल्य पाखंडी अस्मितांच्या आधारावर मतदान करणारे माझ्या लेखी विवेकशील व सुज्ञ नाही ! काही महत्वाची सूत्रे कायमची समजून घ्या ! राजकारण हा जगातील सगळ्यात गलिच्छ व्यवसाय असून त्याच्याशी सबंधित ९९ % लोक हे "सर्वअवगुणसंपन्न" भ्रष्ट आहे ! आपल्याला कमीत कमी "सर्वअवगुणसंपन्न " व्यक्तीची निवड करावयाची आहे जी आपले कमीत कमी शोषण करेल ! आजचे प्रमुख पक्ष म्हणजे कॉंग्रेस व भाजपा यांच्या जन्मदात्यांचे उद्देश कधीच धुळीस मिळाले असून आज कॉंग्रेस जर ढोंगी धर्मनिरपेक्षतेच अपत्य आहे तर भाजपा पाखंडी राष्ट्रवादाच अपत्य आहे ! बाकीचे पक्ष हे कौटुंबिक मालकी हक्काचे प्रा.ली. मर्कटलीला कंपनी सारखे असून जास्त बहारदार फळे असलेला वृक्ष बघून ते इकडून तिकडे युत्या...
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू !