कोण म्हणत महागाई वाढली आहे ?

कोण म्हणत महागाई वाढली आहे ?

 

ganesh avasthi writings


कोण म्हणतं महागाई वाढली आहे ?

होर्डिंगखाली 17 व पोर्षे खाली 2 जीव दीड दमडी सारखे चिरडले गेले पाहिलं नाही का तुम्ही  ?

धनाढ्यासाठी न्याय - पोलीस व्यवस्था दीड दमडीची तर न्याय - पोलिस व्यवस्थेसाठी सामान्य जनता दीड दमडीची !

कोण म्हणतं महागाई वाढली आहे ?

पक्ष अध्यक्षासाठी नेते दीड  दमडीचे, नेत्यांसाठी कार्यकर्ते दीड दमडीचे , कार्यकर्त्यांसाठी स्वाभिमान दीड दमडीचा  !

कालपण - आजपण  ! 

कोण म्हणतं महागाई वाढली आहे !

भ्रष्ट ज्ञान मंदिरासाठी विद्यार्थी दीड दमडीचे तर भ्रष्ट विद्यार्थ्यांसाठी ज्ञान दीड दमडीचे !

भ्रष्ट मालकांसाठी कामगार दीड दमडीचा तर संसाराचा गाडा ओढणाऱ्या कामगारांसाठी स्वतःचा जीव दीड दमडीचा !

कोण म्हणतं महागाई वाढली आहे !

जमिनीच्या तुकड्यापुढे रक्ताची नाती दीड दमडीची !

हुंडा - वंशाचा दिवा - मान देत डेट नाही सून दीड दमडीची !

डिग्री होल्डर सुनेसाठी सासू - सासरे दीड दीड दमडीचे !

वृद्ध आश्रमात राहणाऱ्या आई बापासाठी लेकरांची माया दीड दमडीची !

कोण म्हणतं महागाई वाढली आहे !

भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी ग्राहक दीड दमडीचा !

भ्रष्ट रुग्णालयासाठी रुग्ण दीड दमडीचा !

बुवा-बाबासाठी भक्त दीड दमडीचे तर भक्तासाठी संतवचने दीड दमडीचे ! 

कोण म्हणत महागाई वाढली आहे ?

भ्रष्ट करमणूककारांसाठी प्रेक्षक दीड दीड दमडीचे ! 

भ्रष्ट खेळाडूसाठी खेळ दीड दमडीचा !

नशा व्यापार्यासाठी समाज दीड दमडीचा  !  

समाजासाठी नैतिकता दीड दमडीची !

कोण म्हणत महागाई वाढली आहे ?

जातीयवाद - धर्मवाद - प्रांतवाद - भाषावाद - यांच्य्यापुढे राष्ट्रहित दीड दमडीचे !

राष्ट्रद्रोह्यासाठी  वीरांच बलिदान दीड दमडीच !

कोण म्हणत महागाई वाढली आहे !

इथे सगळ दीड दमडीच तर आहे ! काल पण आजपण ! कोण म्हणत महागाई वाढली आहे ?

गणेश किशोर अवस्थी 

दिनांक 

२९ में २०२४ 



Ganesh K Avasthi
Blog Admin




Post a Comment

0 Comments