भारतीय "चळवळ-आंदोलन-मोर्चे-सत्याग्रह" भारतातील अथवा जगातील बहुतांशी तथाकथित "चळवळ-आंदोलन-मोर्चे-सत्याग्रह" हे छुप्या राजकीय महत्वकांक्षेने प्रेरित असतात ! त्यांना जनहित-समाजहित यांचा मुलामा चढविन्यासाठी जनतेच्या मनातील भावनीक क्षुब्धता ओळखायची असते व त्या विषयाला धरून तथाकथित "चळवळ-आंदोलन-मोर्चे-सत्याग्रह" यांची राळ समाजमाध्यमे - प्रिंट मीडिया - इलेक्ट्रॉनिक मीडिया - समाजिक संस्था यांच्याद्वारे उडविणे क्रमप्राप्त ठरते ! जनतेला देखील स्वतःच्या क्षुब्धतेला शांत करण्यासाठी काहीतरी सनसनाटी व्हावे अशी सुप्त ईच्छा असते व जनतादेखील काहीशा प्रमाणात ह्या न त्या मार्गाने आपला सहभाग नोंदवत आपली ईच्छापुर्ती करत असते ! सर्व गणिते ठरविल्या गेलेल्या योजनेप्रमाणे योग्य जुळून जर आली तर ज्या छुप्या राजकीय महत्वकांक्षेने ही तथाकथित "चळवळ-आंदोलने-मोर्चे-सत्याग्रह" सुरू करण्यात आली होती त्याला फळप्राप्ती ही सत्ताबदलच्या रूपाने मिळते ! चळवळकर्ते एकदा राज्यकर्ते बनले की त्या चळवळीचा जनहित-समाजहिताचा मुखवटा कालांतराने हटवला जातो ! भविष्यातील आव्हानांना सुरवातीलाच ...
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू !