कलीयुगातील मृत्युंजयी ! नागपूर येथील रा.स्व.संघाचे 85 वर्षीय श्री. नारायण दाभाडकर हे कोरोनाने बाधित होते व त्यांच्यावर रुग्णालयात उपचारदेखील सुरू होते ! ते ज्या रुग्णालयात दाखल होते तिथे एक महिला चाळीशीच्या वयातील एका रुग्णासाठी ऑक्सिजन बेड मिळावा म्हणून धावपळ करतांना त्यांच्या निदर्शनास आले ! त्यांनी या संपूर्ण घटनेला पाहून काय निर्णय घेतला असेल ?? ह्या 85 वर्षाच्या आजोबांनी घेतलेला निर्णय आजच्या काळात हा आपल्याला त्याग,समर्पण,सेवा काय असते हे शिकवून जाते ! आजोबांनी डॉक्टरांना बोलावून घेतले व सांगितले की मी माझे आयुष्य जगलो आहे, परंतु हा तरुण आहे जो जगला पाहिजे, माझा बेड ह्या तरुणाला द्या व त्याला जगवा ! आले न अंगावर काटे ! बसमध्ये प्रवास करतांना धडधाकट लोक आपली जागासुद्धा कुणाला लवकर देत नाही तिथे ह्या आजोबांनी आपल आयुष्यच त्या तरुणाला अर्पण करून टाकले ! आजोबांना घरच्यांनी व डॉक्टरांनी खूप संमजविण्याचा प्रयत्न केला परंतु आजोबांनी काही ऐकले नाही व आपला बेड आजोबा त्या तरुणाला देऊन घरी गेले ! परिणाम अपेक्षितच होता ! आजोबांचा घरी मृत्यू झाला ! जेव्हा ही घटना कळली तेव्हा एकच वा...
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू !