कोण म्हणतं महागाई वाढली आहे ? होर्डिंगखाली 17 व पोर्षे खाली 2 जीव दीड दमडी सारखे चिरडले गेले पाहिलं नाही का तुम्ही ? धनाढ्यासाठी न्याय - पोलीस व्यवस्था दीड दमडीची तर न्याय - पोलिस व्यवस्थेसाठी सामान्य जनता दीड दमडीची ! कोण म्हणतं महागाई वाढली आहे ? पक्ष अध्यक्षासाठी नेते दीड दमडीचे, नेत्यांसाठी कार्यकर्ते दीड दमडीचे , कार्यकर्त्यांसाठी स्वाभिमान दीड दमडीचा ! कालपण - आजपण ! कोण म्हणतं महागाई वाढली आहे ! भ्रष्ट ज्ञान मंदिरासाठी विद्यार्थी दीड दमडीचे तर भ्रष्ट विद्यार्थ्यांसाठी ज्ञान दीड दमडीचे ! भ्रष्ट मालकांसाठी कामगार दीड दमडीचा तर संसाराचा गाडा ओढणाऱ्या कामगारांसाठी स्वतःचा जीव दीड दमडीचा ! कोण म्हणतं महागाई वाढली आहे ! जमिनीच्या तुकड्यापुढे रक्ताची नाती दीड दमडीची ! हुंडा - वंशाचा दिवा - मान देत डेट नाही सून दीड दमडीची ! डिग्री होल्डर सुनेसाठी सासू - सासरे दीड दीड दमडीचे ! वृद्ध आश्रमात राहणाऱ्या आई बापासाठी लेकरांची माया दीड दमडीची ! कोण म्हणतं महागाई वाढली आहे ! भेसळ करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी ग्राहक दीड दमडीचा ! भ्रष्ट रुग्णालयासाठी रुग्ण दीड दमडी...
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू !