राफेल व रा - हुल ! गेल्या काही महिन्यापासून कांग्रेस अध्यक्ष मा.श्री. राहुल गांधी हिंदू-मुस्लिम-दलित-मनु फिरून झाल की पुन्हा राफेल व्यवहार यावर येत आहे, अणि जणू काही ह्याच मुद्यावर सद्य NDA सरकारला ते उलथावुन टाकतील की काय अशी भाबडी आशा कुटुंब समर्थकाना वाटते ! राहुल गांधी यांच्या आजवरच्या वाटचालीकड़े प्रमाणिकपणे पाहिल्यास, निष्ठेने नव्हे फ़क्त प्रमाणिकपणे पाहिल्यास त्यांना ह्या विषयाच फार गांभीर्य आहे अथवा त्यांच्या सल्लागाराना ( जे राहुल गांधी यापेक्षा जास्त लायक व् बुद्धिमान आहेत ) ह्या व्यवहारातल काहीच माहित नाही असे वाटत नाही. परंतु जर काही मुद्देच सापडत नसतील तर भ्रम-हूल पसरवणे मग ते भ्रम EVM बद्दल असो, लोकशाहीच्या खुना बद्दल असो, दलित-मुस्लिम अत्याचार असो, सर्जिकल स्ट्राइक असो अथवा राफेल व्यवहार असो. भ्रम हे मोठया शस्त्राप्रमाणे सर्वच राजकीय पक्ष-धुरंधर वापरत आले आहे व् ते कमी-अधिक प्रमाणात यशस्वी देखिल झाले आहे. आता अविश्वास ठराव प्रस्तावाच्या भाषणात श्री. राहुल गांधी म्हणाले की मला फ़्रांसच्या राष्ट्र-अध्य्क्षानी सांगितले की आम्हाला झालेला व्यवहार उघड करण्यात ...
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करू !