श्रीमद्भगवद्गीता अध्याय २ सांख्ययोग - स्वामी रामसुखदास टीका सारांश-दिवस २ १ ) समजदार व श्रेष्ठ पुरुषामध्ये जे भाव निर्माण होतात ते आपल्या कल्याणाला अनुसरूनच होतात. २ ) कल्याणइच्छुक पुरुष प्रवृत्ती व निवृत्ती दोन्हीमध्ये आपल्या कल्याणाचाच उद्देश ठेवतात ! त्यांच्यात कर्तव्याच्या बाबतीत भीती निर्माण होत नाही ! ३ ) ३ प्रकारचे मनुष्य असतात ! १ = विचारशील ज्यांची आपले कल्याण व्हावे हि इच्छा असते २ = पुण्य करून स्वर्ग प्राप्तीची इच्छा करणारे ३ = साधारण मनुष्य जगालाच सर्व काहीसंजून जगामध्ये कीर्ती - प्रतिष्ठा मिळावी हि इच्छा करणारे ! ४ ) जे महान असतात ते द्रव्याची ( संपत्ती ) कामना करूच शकत नाही, जे द्रव्याची कामना करतात ते महान असूच शकत नाही ! ५ ) वाईट गोष्ट जर वाईटाच्या रूपानेच आली तर ती नष्ट करण्यास सोपी जाते, परंतु वाईट गोष्ट चांगुलपणाचे पांघरून घेऊन येते तिला नष्ट करणे सोपे नसते ! ६ ) केवळ भौतिक दृष्टी ठेवून कल्याणचा विचार येऊ शकत नाही ! ७ ) मनुष्य चिंतेने व शोकाने जेव्हा विव्हळ होतो तेव्हा तो कर्तव्य - अकर्तव्य याचा बोध न झाल्याने काहीही बरळत असतो ! ८...