मी देखिला रुद्राचा चंद्र्भिषेक ! चंद्र माथ्यावरी येई अभिषेकी या माझ्या रुद्रा ! पाहता माझ्या रुद्राचा चंद्र्भिषेक झुकते माझे मस्तक, येती डोळी अश्रू, सुटे हृदयास कंप, जुडते माझे कर, मुखी निघे स्तवन आपोआप ! तुम्हा कारणे सुरक्षित झाले शिव - शक्ती, राम - कृष्ण, अभंग - संतवचने व आमचे भविष्य ! तुम्हीच माझे शिव - शक्ती ज्यांनी पचविले रक्तबीजरुपी यवनी हलाहल ! तुम्हीच माझे मर्यादापुरषोत्तम राम ज्यांनी रक्षिले माता - बघिनिंचे शील ! तुम्हीच माझे कृष्ण ज्यांचे जीवन माझ्यासाठी आहे गीतेचे असंख्य अध्याय ! याच अध्यायातून जन्मले असंख्य अर्जुन ज्यांनी केले आहे, करत आहे, करत राहतील यत्ने या पुण्यभूमीचे पावित्र्य जपण्याचे ! चंद्र माथ्यावरी येई अभिषेकी या माझ्या रुद्रा ! हर हर हर हर महादेव ! देव अवस्थी !