मी देखिला रुद्राचा चंद्र्भिषेक !

मी देखिला रुद्राचा चंद्र्भिषेक !


मी देखिला रुद्राचा चंद्र्भिषेक !


देव अवस्थी


चंद्र माथ्यावरी येई अभिषेकी या माझ्या रुद्रा !

पाहता माझ्या रुद्राचा चंद्र्भिषेक झुकते माझे मस्तक,

येती डोळी अश्रू, सुटे हृदयास कंप, जुडते माझे कर, मुखी निघे स्तवन आपोआप !

तुम्हा कारणे सुरक्षित झाले शिव - शक्ती, राम - कृष्ण, अभंग - संतवचने व आमचे भविष्य !

तुम्हीच माझे शिव - शक्ती ज्यांनी पचविले रक्तबीजरुपी यवनी हलाहल !

तुम्हीच माझे मर्यादापुरषोत्तम राम ज्यांनी रक्षिले माता - बघिनिंचे शील !

तुम्हीच माझे कृष्ण ज्यांचे जीवन माझ्यासाठी आहे गीतेचे असंख्य अध्याय !

याच अध्यायातून जन्मले असंख्य अर्जुन 

ज्यांनी केले आहे, करत आहे, करत राहतील यत्ने या पुण्यभूमीचे  पावित्र्य जपण्याचे !

चंद्र माथ्यावरी येई अभिषेकी या माझ्या रुद्रा !

हर हर हर हर महादेव !

देव अवस्थी !

देव अवस्थी


Post a Comment

1 Comments