कळणे वासियांचा दडपलेला संघर्ष ! मूळ लेखक : अर्चना परब विनोद पाटील नावाच्या सैतानाचा डोळा निसर्गसंपन्न कळणे गावावर पडला आणि ईथेच सूरू झाला कळणे गावातील निसर्गाचा र्हास. बघता बघता ह्या माणसांने एक सामाईक डोंगर घश्यात घातला. ह्या गावातील काही लोक मुठभर पैश्यांसाठी विकले गेले. ते लोक आज नक्कीच डोक्याला हात लाऊन बसले असतीलही पण त्यांच्या मुळे आज पुर्ण गाव परीणाम भोगत आहे. ह्याची सुरवात झाली 2009 साली. जनसुनावणी मध्ये ह्या मायनिंग प्रकल्पाला 100% विरोध होता. विरोध बघुन जनसुनावणी पुढे ढकलण्यात आली. पण हा विरोध पुढेही कायमच होता. गावकऱ्यांच्या विरोधामुळे ह्या कंपनीने आपले डावपेच खेळायला सूरवात केली. मायनिंग परीसरा पासुन एक किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी असलेली नदी आणि २०-२५घरांची वाडीच नकाशावरून गायब केली. आणि चार लोंकाना धाक दाखवून जमिन हस्तगत केली. ज्याची ईतर गाववाल्यांना काहीच कल्पना नव्हती. अर्थात हे सगळं करताना राजकीय नेत्यांचा पाठिंबा होताच. लाचखोर नेत्यांच्या देशात अश्या जमिनी हस्तगत करणे तितकं कठीण नाहीच. एक दिवस ...