Skip to main content

Posts

स्ट्रिंग ऑफ फ्लॉवर्स आणी चीनची घुसमट !

स्ट्रिंग ऑफ  फ्लॉवर्स आणी चीनची घुसमट ! ९० च्या दशकात वेगाने होणाऱ्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेत हिंद महासागराला अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झाले होते. विकसित व विकसनशील अशा देशांसाठी  ७३,५५६,००० स्क्वेअर किमीचा हा सागरी प्रदेश अर्थ -संरक्षण-विदेशनीती  ह्या तिघांच्या दृष्टीने प्राथमिकतेचा विषय झाला होता व त्या दिशेने अमेरिका, रशिया, चीन, फ्रांस, जपान ह्यांनी अत्यंत वेगाने ह्या सागरी प्रदेशावर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्यास सुरवात केली होती. असे काय महत्व आहे हिंद महासागराचे हे समजून घेतल्याशिवाय भारताचा ह्या सागरी प्रदेशात झालेला प्रवेश फार महत्वाचा वाटणार नाही. हिंद महासागरालगतच्या तब्बल ३० देशांकडे जगातील एकूण तेलसाठ्यापैकी ५५ % तेलसाठा आहे. नुसते तेलचं नाही तर ४० % सोने, ३६ % नैसर्गीक वायू, ६०% युरेनियम अशा प्रत्येक विकसित देशाच्या पुढारलेपणास  जबाबदार असलेल्या नैसर्गिक साधन-संपत्ती यांचा अमूल्य असा खजिना आहे आणि ह्या ३० देशातूनच संपूर्ण जगभरात ह्या साधन-संपत्तीचा पुरवठा हिंद महासागरामार्फत होत असतो. जगातील ९० % कच्चे तेल हे गल्फ देशांमधून यु...

गांधीज - ठग्ज ऑफ नॅशनल हेराल्ड !

गांधीज - ठग्ज ऑफ नॅशनल हेराल्ड ! कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. राहुल गांधी यांनी आवेशाने राफेल ह्या विषयामधे ह्या न त्या प्रकारे इंधन ओतून ओतून त्याला ज्वलंत ठेवण्याचा प्रयत्न कित्येक महिन्यापासून सुरु ठेवला आहे ज्यामधे देशातील नामांकित “”बुद्धिवंतांची”” फौजदेखिल त्यांच्या साथीला इमाने-इतबारे उभी आहे ! परंतु ह्या बुद्धिवंतांच्या फौजेमधील एकही गांधीना ना नॅशनल हेराल्ड वर प्रश्न विचारतात ज्या केसमधे श्रीमती गांधी व श्री. रा. गांधी जामिनावर बाहेर आहेत न औगस्ता वेस्टलैंड केस मधील दलाली बद्दल ज्या मधे दलालाने स्वतः ह्यांचे नाव घेतले आहे ! मा. शरदचंद्र पवार तर याला गांधी कुटुंबियाविरुद्धच षडयंत्र घोषित करुन मोकळेदेखिल झाले आहेत ! निर्भिड व् निष्पक्ष पत्रकारितेचा टेंभा मिरवणारे ज्याना मोदी पंतप्रधान होण्यामागे जागतिक व्यापक कटाचा वास येतो असे नॅशनल हेराल्ड व् औगस्ता वेस्टलैंड ने लावलेल्या आगिकड़े सोयीस्कर दुर्लक्ष करतात ! नॅशनल हेराल्ड नेमकी काय प्रकरण आहे व् गांधी कुटुंबियानी कशी २००० करोड़ची ढेकर देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला हे समजुन घेणे गरजेचे आहे. हे समजुन घेतल्यावर गांधीमागे एवढी बु...

निवडणुक - ई.व्ही.एम - मांडूळ

निवडणुक - ई.व्ही.एम - मांडूळ   भाग  १  दिनांक ११ डिसेम्बर २०१८  दिनांक ११ -१२-२०१८ अगोदर 

राफेल व रा - हुल !

राफेल व रा - हुल ! गेल्या काही महिन्यापासून  कांग्रेस अध्यक्ष मा.श्री. राहुल गांधी हिंदू-मुस्लिम-दलित-मनु फिरून झाल की पुन्हा राफेल व्यवहार यावर येत आहे, अणि जणू काही ह्याच मुद्यावर सद्य NDA सरकारला ते उलथावुन टाकतील की काय अशी भाबडी आशा कुटुंब समर्थकाना वाटते ! राहुल गांधी यांच्या आजवरच्या वाटचालीकड़े प्रमाणिकपणे पाहिल्यास, निष्ठेने नव्हे फ़क्त प्रमाणिकपणे पाहिल्यास त्यांना ह्या विषयाच फार गांभीर्य आहे अथवा त्यांच्या सल्लागाराना ( जे राहुल गांधी यापेक्षा जास्त लायक व् बुद्धिमान आहेत ) ह्या व्यवहारातल काहीच माहित नाही असे वाटत नाही. परंतु जर काही मुद्देच सापडत नसतील तर भ्रम-हूल पसरवणे मग ते भ्रम EVM बद्दल असो, लोकशाहीच्या खुना बद्दल असो, दलित-मुस्लिम अत्याचार असो, सर्जिकल स्ट्राइक असो अथवा राफेल व्यवहार असो. भ्रम हे मोठया शस्त्राप्रमाणे सर्वच राजकीय पक्ष-धुरंधर वापरत आले आहे व् ते कमी-अधिक प्रमाणात यशस्वी देखिल झाले आहे. आता अविश्वास ठराव प्रस्तावाच्या भाषणात श्री. राहुल गांधी म्हणाले की मला फ़्रांसच्या राष्ट्र-अध्य्क्षानी सांगितले की आम्हाला झालेला व्यवहार उघड करण्यात ...

केरली टेकक्स “हंगेरीयन अर्जुन” Karoly TAKACS Biography, Olympic Medals, Records and Age

केरली टेक क्स “हंगेरीयन अर्जुन”  Karoly TAKACS Biography, Olympic Medals, Records and Age आपल्याकडे आज “ केरली टेक क्स” ( Karoly TAKACS) हे नाव फार कुणाला माहित असण्याची शक्यता नाहीच्याच घरात आहे. परंतु त्याची यशोगाथा वाचल्यावर तुम्ही त्याला कधीही विसरु शकणार नाही हे नक्की ! तो तुम्हाला तुमच्या जिवनातील प्रत्येक बिकट प्रसंगासमोर निधड्या छातीने उभे रहायला भाग पाडल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यात मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांमुळे तुम्ही कोलमडायला लागलात की “केरली” तिथे तत्काळ हजर होइल अगदी “टेरी” सारखाच !  टेरीबद्दल खालील लिंक वर अधिक माहिती घ्या ! (  https://www.nirbhid.com/2023/01/Terry-Fox-Run.html  )  आणि त्याच्याकड़े पाहून तुम्हाला समोर असलेल्या अप्रिय परिस्थितीला वाकुल्या दाखवण्याची शक्ति नक्कीच मिळेल. हे तितकस सोपे नाहीये हेदेखील खरेच हे त्याची यशोगाथा वाचल्यावर लक्षात येईलच ! २१ जानेवारी १९१० रोजी केरलीचा  ( Karoly TAKACS)   जन्म बुडापेस्ट, हंगेरी येथे झाला. तत्कालीन युद्धजन्य परिस्थितिमुळे कमी वयातच केरली हंगेरी आर्मी मधे दाखल झाला. सैन्य प्रशि...

The Mushroom Shot i Taken At Vaitarana Back Water

  The Mushroom Shot i Taken At Vaitarana Back Water

सुखदायक - अल्हाददायक - स्थिर - जीवनदायिनी माता गोदावरी !