श्रीमद्भगवद्गीता अध्याय २ सांख्ययोग - स्वामी चिन्मयानंद टीका सारांश-दिवस ३ १ ) अस्तित्वात असलेल्या सर्वांस ज्याने व्यापले आहेत आणि आपल्या अनुभवास येणाऱ्या दृश्य जगताचे जे अधिष्ठान आहे ते म्हणजे सत. आकार, रंग वेगवेगळे असलेल्या वेगवेगळ्या मातीच्या भांड्याना त्यांच्या उपयोगितेनुसार किंवा त्यातील वस्तू नुसार वेगवेगळी नावे असतात तरीही त्या सर्वांमधील माती एकच असते आणि मातीशिवाय भांड्याचेअस्तित्व नसते. मातीतून ते उत्पन्न होतात माती त्यांचे अस्तित्व असते त्यांचा नाद झाल्यावर त्यांची नामेरूपे मातीशी एकरूप होतात. त्याचप्रमाणे परिवर्तनशील संपूर्ण जगत अपरिवर्तनशील सतस्वरूपाने व्यापलेले आहे. २ ) इंद्रिय-मन-बुद्धी ही ज्ञानग्रहणाची उपकरणे जड असतात आणि जीवनशक्ती चैतन्याकडून शक्ती मिळाल्यावर त्यांना विषय ज्ञान होऊ शकते. ३ ) प्रत्येकाने पराजयाची प्रवृत्ती सोडून जीवनात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीच्या परिस्थितीचा निष्ठापूर्वक धैर्याने सामना केला पाहिजे. अधर्माचा सक्रिय प्रतिकार हा श्रीकृष्णांचा गीतेतील मुख्य संदेश आहे. ४ ) जन्म-अस्तित्व-वृद्धी-विकार-क्...