सर्वे भवन्तु सुखिनः

सर्वे भवन्तु सुखिनः



सर्वे भवन्तु सुखिनः

भारताने २० जानेवारी २०२१ पासून आतापर्यंत तब्बल ५६,००,००० ( ५६ लक्ष ) कोविड लस ह्या खालील देशांना भेट स्वरुपात दिल्या असून भविष्यात ही संख्या अजुन वाढणार आहे !

भूटान : १,५०,०००

मालदीव : १,००,०००

नेपाळ : १०,००,००

बांग्लादेश : २०,००,०००

म्यानमार : १५,००,०००

मॉरीशिएस : १,००,०००

सेशेल्स : ५०,०००

श्रीलंका : ५,००,०००

बहरीन : १,००,०००

ओमान : १,००,०००

दिनांक ९ फेब्रुवारी रोजी डोमिनिक देशाचे पंतप्रधान ज्याची लोकसंख्या फक्त ७२,००० हजार असून भारतीय पंतप्रधान व भारतीय नागरिकांचे आभार व्यक्त करतांना म्हणाले  "मी कल्पना देखील करू शकत नव्हतो की आमच्या इतक्या छोट्या देशाला भारतीय पंतप्रधान लस पुरविण्याबाबत प्राथमिकता देतील, मी भारतीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी व भारतीय नागरिकांचे आभार व्यक्त करतो !

कैनडाच्या पंतप्रधानांनी देखील १० फेब्रूवारी २०२१ रोजी भारतीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनिने सवांद साधुन लस मिळविण्याकरिता विनंती केली आहे !

येत्या काळात मेक्सिकोला देखील ५,००,००० कोविड लस रवाना करण्यात येणार आहे !

एकूण १५ देशांना लस पुरविण्यात आली असून  २५ देश हे तब्ब्ल २५,००,००० लस स्विकारण्यासाठी इच्छुक आहे !

इतकेच नव्हे तर भारत हा 3 क्रमांकचा देश बनला आहे ज्याने आपल्या  ५७,००,००० लक्ष नागरिकांना कोविड लस दिली आहे ! भारताच्या आधी अमेरिका व ब्रिटन हे दोन देश आहेत !

भारतीय संस्कृतीचे दृढ प्रतीक मानल्या जाणाऱ्या प्रतिकांपैकी एक प्रतीक म्हणजे उपनिषद व ह्यापैकी एक  वृहदारण्यक उपनिषद् मधील

 "सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत। ऊँ शांतिः शांतिः शांतिः"

मराठी अर्थ - "सर्व सुखी होवो , सर्व रोगमुक्त राहो, सर्वजण मंगलमय घटनांचे साक्षीदार बनो, व कुणालाही दुःखाचा भागीदार बनण्याची वेळ न पडो"

हिंदी अर्थ - "सभी सुखी होवें, सभी रोगमुक्त रहें, सभी मंगलमय घटनाओं के साक्षी बनें और किसी को भी दुःख का भागी न बनना पड़े।"

ह्या शांती पाठाचा परिचय व प्रत्यक्ष अनुभव आपला देश हा संपूर्ण जगाला आपल्या कृतीतून देत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही व नक्कीच एक भारतीय म्हणून समस्त भारतीयांसाठी  अभिमानाची बाब आहे !

जय हिंद !


Post a Comment

2 Comments