Posts

Showing posts from October, 2017

शाम रंगीला आणि कॉंग्रेसची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची “रंगीला” ओरड !

Image
    शाम रंगीला आणि कॉंग्रेसची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची “ रंगीला ” ओरड ! सर्वात प्रथम आपल्या देशात घडणाऱ्या अथवा घडवून आणल्या जाणाऱ्या घटनांची पार्श्वभूमी तपासणे खुपच गरजेचे असते , ती   न तपासता जर त्या घटनांवर विश्वास ठेवायचा झाल्यास आपला कालांतराने भ्रमनिरास झाल्याशिवाय राहत नाही ! आता ताजी घटना आहे शाम रंगीला ह्या नक्कल करणाऱ्या कलाकाराची ! एका वाहिनीवर “ द ग्रेट इंडिअन लाफ्टर चालेंज ” हा विनोदी कार्यक्रम चालवला जातो , त्यात शामने पंतप्रधान नरेंद्र मो दी व् कां ग्रेसचे भावी पंतप्रधान   राहुल गाँधी यांची अतिशय सुरेख अशी नक्कल केलि! त्या वाहिनीने त्या भागाला प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला व् शामला दोघांची नक्कल न करण्याचा सल्ला दिला ! आता यात कोणत्याही सरकारी संस्थेचा , पक्षाचा व् संघटनेचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही ! परंतु “ द वायर “ ह्या मोदीज्वराने ग्रस्त असलेल्या   संकेतस्थळावर सर्वात प्रथम याला ह्या सरकारमध्ये गळचेपी कशी होतेय हे नेहमीप्रमाणे तथ्याना तोडून-मोडून सांगण्यात आले ! आता यांच्या संपादकविषयी जाणून घ्या ! याचे संपादक आहेत कॉंग्रेसचे अतिप्रिय पत्रका