टेरी फॉक्स ( टेरंस स्टानली फॉक्स ) एक उर्जास्त्रोत !


जन्म : २८ जुलै १९५८   मृत्यू :- २८ जुन १९८१
 
कॅनडा मध्ये एक सर्वसाधारण कुटुंबामध्ये जन्माला आलेला टेरी आज छोट्या छोट्या गोष्टीनी हताश/निराश होणाऱ्या माझ्यासहित जगातील सर्वच स्तरावरील लोकांसाठी एक उर्जास्त्रोत आहे !

१९५८ मध्ये जन्माला आलेल्या टेरीला मार्च १९७७ मध्ये पायाचा कर्करोग झाल्याच निदान झाल ! १९ वर्षाच्या टेरीला आपला एक पूर्ण पाय गमवावा लागला ! परंतु टेरीने निराश न होता कृत्रिम पायाच्या साह्याने इतर कर्करोगग्रस्त रुग्णांना आत्मविश्वास मिळावा म्हणून पुढील आयुष्य खर्ची करण्याच ठरवल ! कर्करोगाच्या उपचारादरम्यान टेरीच्या वाचनात एक लेख आला ज्याने टेरीच्या कार्याला एक दिशा देण्याच काम केल ! टेरीने कर्करोगच्या जनजागृतीसाठी कृत्रिम पायाच्या साह्याने धावायचं ठरवल ! त्यासाठी त्याने प्रयत्न चालू केल्यानंतर अनेक अडचणी व दुखापतीचा सामना केला परंतु न डगमगता त्याने स्वताला एका अद्वितीय कार्यासाठी तयार केल ज्याने त्याला निरोगी शरीर असणारयासाठी देखील एक उर्जास्त्रोत बनवल आहे !


त्याने पूर्ण कॅनडा मध्ये धावून प्रत्येक नागरिकाकडून १ डॉलर जमा करायचं ठरवल, तेही एका कृत्रिम पायाच्या साह्याने ! १२ एप्रिल १९८० ला २१ वर्षीय टेरीने धावण्यास सुरवात केली व अनेक अडचणी व दुखापतींचा सामना करत २१ वर्षीय तरुणाने १४३ दिवस सलग धावून ५३७३ किमी. अंतर पार पाडले व त्याची हि धाव बळजबरी थांबवली गेली, कारण कर्करोग त्याच्या फुफ्फुसा पर्यंत येवून पोहोचला होता ! ह्या दरम्यान त्याला हळूहळू देशाच्या सर्व स्तरातून प्रचंड असे समर्थन मिळायला लागले व तो एक नायकाच्या स्वरुपात देशाच्या समोर उभा राहिला !
ह्या १४३ दिवस ५३७३ किमी. च्या धावण्यात तब्बल १७ लाख डॉलर एव्हढी प्रचंड मदत त्याने मिळवली !
त्याच्या ह्या कार्याने प्रभावित होऊन जगभरातून त्याला मदतीचा ओघ सुरु झाला त्यातून त्याने २ करोड ३० लाख डॉलर एव्हढी रक्कम कर्करोग संशोधनासाठी जमा केली ! टेरी आता फक्त कॅनडा नव्हे तर जगभरासाठी एक नायक बनला होता ! त्याला देशाच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले. अशा ह्या उर्जास्त्रोताच २८ जून १९८१ रोजी वयाच्या २२ व्या वर्षी निधन झाले !

१९८१ मध्ये टेरीच्या सन्मानार्थ कर्करोग संशोधनासाठी “टेरी फॉक्स रन” आयोजित करण्यात आला ज्यात ६० देशाच्या लाखो लोकांनी सहभाग नोंदवत तब्बल ६५ करोड डॉलर एव्हढी रक्कम जमवण्यात आली जी आजवरची सर्व्वोच मदत होती !

आज पूर्ण कॅनडा मध्ये टेरीच्या सन्मानार्थ अनेक रस्ते, महाविद्यालय, संशोधन केंद्र, महत्वाच्या इमारती एव्ह्डेच नव्हे तर पर्वतदेखील एक उर्जास्त्रोत म्हणून दिमाखात उभे आहे !

Comments

Post a Comment