“एम्बुलेंस दादा” करीमुल हक एक आरोग्यदूत”


पद्मश्री करीमुल हक एक “आरोग्यदूत”

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी खेड्यातील एक तरुण १९९५ मधे आपल्या वृद्ध आईला त्वरित उपचार मिळावे म्हणून सैरभैर होऊंन दारोदार भटकला, परंतु कुठल्याही प्रकारची रुग्नवाहिका सेवा न मिळाल्याने त्याच्या मातेने त्याच्या डोळ्यासमोर आपला देह टाकला..

किती दुर्दैवी व हृद्य हेलावून टाकणारी घटना असेल ती ?

चहाच्या मळ्यात काम करणारा करीमुल ह्या घटनेने व्यतिथ झालाच परंतु निराश नाही झाला ! त्याने त्यानंतर मिळेल त्या साधनानी रुग्णाना त्वरित उपचारासाठी स्वखर्चाने दवाखान्यात दाखल करण्यास सुरवात केली. त्याचे हे निस्वार्थी सेवेचे कार्य चालू असतांनाच त्याचा एक सहकारी काम करतांना अचानक कोसळला व नेहमीप्रमाणे रुग्णवाहिका सेवा उपलबद्ध होत नाहोये हे पाहून करीमुल ने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या सहकार्याला दुचाकीवर स्वताला बांधल व दवाखान्यात दाखल केल आणि त्याचे प्राण वाचवले. आईचा दुर्दैवी मृत्यू व मित्राची मदत ह्या घटनेने त्याला एक दुचाकी रुग्णवाहिका सुरु करण्याची प्रेरणा दिली व तिथून करुमुलचा अविरत रुग्णसेवेचा प्रवास सुरु झाला तो आजदेखील सुरु आहे !


आज ५० वर्षीय करीमुल धालाबाडी, परिसराच्या जवळपास २० खेड्यामध्ये “एम्बुलेंस दादा” म्हणून ओळखला जातो ! त्याच्या मोफत दुचाकी एम्बुलेंस मध्ये त्याने संपूर्ण प्राथमिक उपचार साहित्य ठेवले असून आजवर त्याने अनेक अडले-नडलेल्या बाया, वृद्ध, तरुण, बालक सर्वच स्तरातील ३००० ते ३५०० रुग्णांना मोफत सेवा पुरवून स्वताला आरोग्यदूत म्हणून सिद्ध केले आहे ! 


जिथे रस्ते-रुग्णवाहिका-दवाखना अशा प्राथमिक सुविधा नाही तेथील लोकांसाठी करीमुल “आरोग्यदुताहून” कमी नाही ! ५००० रु. पगार असणाऱ्या करीमुलच्या घरी त्याची पत्नी व २ मुले-सुना असतानाही त्याने ह्या अतुलनीय अशा रुग्णसेवेमध्ये खंड पडू दिला नाहीये ! त्याचा संपूर्ण पगार हा इंधन व रुग्णाच्या औषधामध्ये खर्च होतो तरीदेखील करीमुल आपल्या रुग्णसेवेपासून कधीही मागे हटत नाही ! करीमुल एव्हढ्यावरच नाही थांबला, त्याने आजवर अनेक आदिवासी भागामध्ये मोफत प्राथमिक उपचार शिबीर आयोजित केले असून तिथे तो जनजागृती हेतूने स्वखर्चाने औषध-उपचार देखील करतो !


करीमुलच्या ह्या निस्वार्थी सेवेला भारत सरकारने गौरविण्याचे ठरवले व मार्च २०१७ मधे पिव्ही सिंधु, विराट कोहली, साक्षी मलिक, पी. गोपीचंद अशा दिग्गज म्हणून ओळखल्या जाणार्या लोकासोबत करीमुलला तत्कालीन राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री ह्या सन्मानाने गौरविण्यात आले !


करीमुलच्या ह्या कार्याला शक्य तितक्या लोकापर्यंत पोहचवून त्याचा सन्मान करुया !
करीमुल तुझ्या ह्या कार्याला खुप खुप प्रणाम !

Comments